मुंबई जुलै महिन्यापासून सुरू झालेली अकरावीसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ झाल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत सुरू 11th Online Admission Special Merit List राहिली. विशेष प्रवेश फेरी देखील झाल्या. आता त्या फेरीची गुणवत्ता आज जाहीर झाली Merit List Announced आहे. विशेष गुणवत्ता यादीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती उपसंचालक शिक्षण विभाग मुंबई यांनी आज ती जाहीर केली आहे.
विशेष फेरीतही रिक्त जागा आणि विद्यालय प्राप्त जागा यामध्ये मोठी तफावत विशेष फेरी प्रवेशासाठी खोटा वगळून एक लाख 64 हजार 191 जागा आहेत. त्यापैकी, अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख 134 इतकी, तर प्रत्यक्ष विद्यालय प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 79 हजार 513 इतकी आहे. रिक्त जागांच्या तुलनेमध्ये विद्यालय प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी तफावत यावेळी स्पष्ट दिसत आहे.
विशेष फेरीसाठी पहिला पसंतीक्रम मिळालेले 49 हजार 800 विद्यार्थी आहे. दुसरा पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थी 19,425 आहे.तिसरा पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थ्यांची संख्या 6103 आणि चौथा पसंती क्रम मिळालेले विद्यार्थी 30987 इतके आहे. पाचवा पसंती क्रम मिळालेले विद्यार्थी 28 59 इतके आहे. सहावा पसंती क्रमसाठी 2019 इतके आहे. सातवा पसंती क्रम मिळालेले विद्यार्थी 1413 इतके आहेत. आठवा पसंतीक्रम साठी विद्यार्थी 884 आहेत. तर नवव्या पसंती क्रमासाठी 600 आणि दहाव्या पसंतीक्रमासाठी 423 विद्यार्थी आहेत.
विद्यालयात जाऊन आपले प्रवेश निश्चित करा विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज आम्ही थोड्याच वेळापूर्वी जाहीर केलेली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेले विद्यालय, जे दिले गेलेले आहे. त्या ठिकाणी त्वरित आपल्या मूळ कागदपत्रांसह भेट देऊन आपले प्रवेश त्वरित निश्चित करावयाचे आहे. अशी माहिती संदीप संगवे शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग यांनी ईटीव्ही सोबत संवाद साधताना दिली. 11th Online Admission Special Merit List Announced