मुंबई - अकरावी प्रवेशासाठी नियोजित सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. तसेच उच्च न्यायालयाने केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या अकरावी प्रवेशासाठी सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश उद्या(14 ऑगस्ट)पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत.
हेही वाचा - विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही - वर्षा गायकवाड
'अशी' असणार प्रक्रिया
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील. त्याबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सविस्तर सूचना निर्गमित करण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणेसाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करून विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा १४ ऑगस्ट, २०२१पासून सुरू करण्यात येत आहे. उद्यापासून ते २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग पहिला भरायचा आहे. तर १७ ते २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचा अर्जाचा भाग दुसरा भरावा लागणार आहे. २५ ऑगस्टला या संदर्भातील पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
हेही वाचा - अकरावी प्रवेशासाठीची CET हायकोर्टाकडून रद्द; या निकालाचा अभ्यास केला जाईल - शिक्षणमंत्री
शिक्षण संचालकांचा सूचना
ऑनलाइन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल, याची दक्षता दक्षता घ्यावी असा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिल्या आहे.