ETV Bharat / city

ईटीव्ही विशेष बातमी : राज्यात अकरा महिन्यांमध्ये रस्ते अपघातात 11 हजार 960 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 8, 2022, 7:14 PM IST

देशात प्रतिवर्षी अपघातात दीड लाख नागरिकांचा ( India Accident Death ) मृत्यू होतो. महाराष्ट्रातही 2021 साली जानेवारी ते नोव्हेंबर या काळात 26 हजार 284 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 11 हजार 960 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात अकरा महिन्यांमध्ये रस्ते अपघातात 11 हजार 960 जणांचा मृत्यू

मुंबई - राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. परंतु, तरीही अपघात कमी झाले नाही. मागील वर्षी जानेवारी - नोव्हेंबर या अकरा महिन्यात राज्यात 26 हजार 284 रस्ते अपघात ( Maharashtra One Year Accident Death ) झाले. त्यात 14 हजार 266 प्रवासी जखमी झाले आहेत, तर 11 हजार 960 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अपघातानंतर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

2019 मध्ये 12 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू

वाहतूक नियमांचे उल्लंघन, चालकाचा निष्काळजीपणा यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. प्रतिवर्षी देशात साधारण 1.50 लाख वाहनचालकांचा ( India Accident Death ) मृत्यू रस्ते अपघातात होतो. राज्यात 2019 साली 32 हजार 925 अपघात झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये 12 हजार 788 नागरिकांचा जीव गेला, तर 19 हजार 152 जखमी झाले. 2020 साली कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन असताना सुद्धा राज्यात 24 हजार 971 अपघात झाले. या अपघातांमध्ये 11 हजार 569 नागरिकांना प्राणांना मुकावे लागले, तर 13 हजार 971 लोक गंभीर जखमी झाले होते. जानेवारी आणि नोव्हेंबर 2021 या अकरा महिन्यांत राज्यातील अपघातांची संख्या ही 26 हजार 248 पर्यंत वाढली आहे. या अपघातांत 11 हजार 960 प्रवाशांचा हकनाक जीव गेला असून, 14 हजार 266 लोक गंभीर जखमी झाले आहेत.

मृत्यूंजय दूत कार्यरत -

अपघातास आळा बसण्यासाठी केंद्र सरकाद्वारे दरवर्षी 'रस्ता सुरक्षा सप्ताह' आयोजित केला जातो. मात्र, तरीही अपघाताची संख्या कमी होत नाही आहे. वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याने हजारो लोकांचा जीव जात आहे. त्यासाठी राज्यात गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना मदत मिळावी म्हणून 6 हजारांपेक्षा मृत्यूंजय दूत कार्यरत आहे. जखमींना त्यांनी वेळेवर वैद्यकीय मदत पोहचवली आहे. त्यामुळे शेकडो जणांचे प्राण वाचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण, तरीही रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

पोलिसांना प्रशिक्षण देणे गरजेचे -

भारतात दरवर्षी दीड लाख नागरिकांचा अपघातात मृत्यू होतो. अपघातानंतर उपचाराअभावी मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेताना योग्य प्रकारे हाताळणी न झाल्यामुळे जखमीच्या शरीराला अधिक इजा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्राणहानीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यासाठी मृत्यूंजय दूत यांच्याप्रमाणे महामार्ग पोलीस दलातील जवानांना अपघातग्रस्तांना हातळण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : अन् कोल्हापुरातल्या हुपरीमध्ये गायींच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.