ETV Bharat / city

SSC-HSC EXAM : दहावी-बारावीच्या परीक्षा यावर्षी ऑफलाईनच?, शिक्षण विभागाच्या बैठकीत एकमत

दहावी-बारावी (SSC-HSC Exam) बोर्डाच्या परीक्षा कधी व कशा घेण्यात याव्यात? विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, परीक्षेसाठी तयारी, पुन्हा कोरोनाची लाट आली त्यावर उपाययोजना कशी करावी, या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ऑनलाईन बैठक घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. आता प्रभाव कमी झाल्याने आगामी परीक्षा ऑफलाईन घेण्याबाबत शिक्षण विभागाच्या बैठकीत एकमत झाले आहे.

varsha gaikwad
varsha gaikwad
author img

By

Published : Nov 23, 2021, 8:21 PM IST

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी- बारावीच्या परीक्षा (SSC-HSC Exam) रद्द करण्यात आल्या होत्या. आता प्रभाव कमी झाल्याने आगामी परीक्षा ऑफलाईन घेण्याबाबत शिक्षण विभागाच्या बैठकीत एकमत झाले आहे. मात्र राज्य शासन स्तरावर स्वतंत्रपणे आढावा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी यावेळी स्पष्ट केले.

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा कधी व कशा घेण्यात याव्यात? विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, परीक्षेसाठी तयारी, पुन्हा कोरोनाची लाट आली त्यावर उपाययोजना कशी करावी, या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ऑनलाईन बैठक घेतली. शासनातर्फे शिक्षण मंत्र्यासोबत शिक्षण सचिव वंदना कृष्णा, आयुक्त विशाल सोळंकी, संचालक दत्तात्रय जगताप, संचालक दिनकर टेमकर, महाराष्ट्र राज्य मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले, राज्यातील प्रातिनिधिक प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक यावेळी उपस्थित होते.

गोंधळ टाळण्यासाठी बैठक -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भावामुळे मागील शैक्षणिक वर्षात सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षात दोन्ही बोर्डाच्या परीक्षा दोन सत्रात घेण्याचा निर्णय घेतला. मूल्यमापनाद्वारे गुण देखील देण्यात आले. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षण विभागाचा गोंधळ उडाला होता. पुन्हा अशीच वेळ शिक्षण विभागावर येऊ नये, यासाठी आज शालेय शिक्षण मंत्री गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी नियोजनबद्ध आढावा बैठक घेऊन चर्चा केली.

परीक्षा ऑफलाईनच होणार?

दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) विद्यार्थ्यांचे यंदा १५ जून पासूनच ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम त्यांचा जवळपास पूर्ण झाला आहे. चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र कोरोना काळात झालेले बदल पुन्हा होणार नाहीत, याची खबरदारी शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. शिक्षण समितीच्या बैठकीत चाचणी, सत्र परीक्षा, मूल्यमापनांवर खलबत झाली. दरम्यान, दरवर्षीच्या प्रचलित नियमाप्रमाणे ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात याव्यात, अशी सूचना अनेकांनी मांडली. राज्य शासन स्तरावर स्वतंत्रपणे आढावा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्री गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.