ETV Bharat / city

सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अखेर आजपासून 100 टक्के फास्टॅग - एमएसआरडीसी फास्टॅग

मागील काही दिवसात फास्टॅगची जनजागृती केल्याने आणि 5 टक्के कॅशबॅकची सुविधा दिल्याने मोठ्या संख्येने वाहनचालकांनी फास्टॅग खरेदी केले आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवशी वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे या मार्गावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टोल नाका
टोल नाका
author img

By

Published : Jan 26, 2021, 5:38 PM IST

Updated : Jan 26, 2021, 7:05 PM IST

मुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अखेर आजपासून राज्यातील दोन मार्गावर इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीसाठीच्या फास्टॅग प्रणालीची 100 टक्के अंमलबजावणी सुरू झाली आहे. वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर फास्टॅग बंधनकारक झाले आहे.

मागील काही दिवसात फास्टॅगची जनजागृती केल्याने आणि 5 टक्के कॅशबॅकची सुविधा दिल्याने मोठ्या संख्येने वाहनचालकांनी फास्टॅग खरेदी केले आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवशी वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे या मार्गावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) मुख्य व्यवस्थापकीय संचालक (टोल) कमलाकर फंड यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

सी लिंकवर दोन हायब्रीड लेन
सी लिंकवरील टोल नाक्यांवर एकूण 16 मार्गिका (लेन) आहेत. त्यानुसार जानेवारी 2020 मध्ये केंद्र सरकारच्या निर्देशानुसार फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. प्रायोगिक तत्वावर 16 पैकी 6 मार्गिका फास्टॅग मार्गिका करण्यात आल्या आहेत. पण, फास्टॅगची उपलब्धता कमी असल्याने तसेच याबाबत जनजागृतीसाठी वेळ मिळणे आवश्यक आहे. सरकारकडून याच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. पण, केंद्र सरकारने 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅगची 100 टक्के अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. त्यानुसार एमएसआरडीसीने आजपासून सी लिंकवर फास्टॅगची 100 टक्के अंमलबजावणी सुरू करत फास्टॅग बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व मार्गिकेवर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. काही जणांनी फास्टॅग न लावल्याने त्यांच्यासाठी 16 पैकी 2 लेन हायब्रीड लेन म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. या लेनवर फास्टॅग वाहनांसह विना फास्टॅग गाड्यांना सोडण्यात येत आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम वसूल केली जात आहे. तर फास्टॅग लेनमध्ये विनाफास्टॅग जाणाऱ्या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जात असल्याचेही फंड यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-26 जानेवारीपासून 'या' दोन मार्गावर फास्टॅगची 100 टक्के अंमलबजावणी

जागेवर फास्टॅग खरेदी!

सी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन मार्गिका हायब्रीड मार्गिका म्हणून तयार करण्यात आल्या आहेत. पण या मार्गिका पुढील काही दिवसांसाठीच असणार आहेत. त्यानंतर फास्टॅग नसलेल्या या दोन्ही मार्गावरून प्रवास करणे महागात पडणार आहे. आज सकाळपासून हायब्रीड मार्गिकेवरून जाणाऱ्या वाहनचालकांना फास्टॅग घेण्यास सांगितले जात आहे. टोल नाक्यावरच फास्टॅग उपलब्ध करून दिले जात आहे. वाहनचालकांनी चांगला प्रतिसाद देत फास्टॅग खरेदी करत असल्याचेही फंड यांनी सांगितले आहे. दोन्ही ठिकाणी कसा प्रतिसाद मिळतो हे पाहत उर्वरित टोलनाक्यावरही 100 टक्के फास्टॅग कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे कमलाकर फंड यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-फास्टॅग कॅशबॅकला भरभरून प्रतिसाद; 3 लाख 45,155 वाहनधारकांनी घेतला लाभ

काय आहे फास्टॅग-

फास्टॅग ही टोलचे पैसे प्रीपेड भरण्याची सुविधा आहे. यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यावर वाहन न थांबविता पुढे जाणे शक्य होते. यामध्ये रेडिओ फिक्वेन्सीची ओळख असलेली चीप वाहनाला बसविण्यात येते.

Last Updated : Jan 26, 2021, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.