ETV Bharat / city

मुंबईत गुरुवार, शुक्रवारी १० टक्के पाणी कपात

उदंचन केंद्र बंद राहणार असल्याने सदर कालावधीत पश्चिम उपनगरे, शहर भागातील लालबाग ते शीव वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील कुर्ला व घाटकोपर विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

water cut
पाणी कपात
author img

By

Published : Aug 24, 2021, 8:48 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या पांजरापूर संकुलातील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचे काम केले जाणार आहे. या कामादरम्यान गुरुवार २६ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजेपासून शुक्रवार २७ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांकरीता सदर उदंचन केंद्र बंद राहणार आहे. या कारणाने सदर कालावधीत पश्चिम उपनगरे, शहर भागातील लालबाग ते शीव वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील कुर्ला व घाटकोपर विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

नवीन उदंचन संच -
मुंबई शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ८० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसविण्यात येणार आहे. हा उदंचन संच बसविण्यापूर्वी ९०० मिलीमिटर व्यासाची एक नवीन झडप बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्र हे २६ ऑगस्ट पासून २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी भांडुप संकुलास होणाऱया पाणीपुरवठ्यामध्ये सुमारे १० टक्के पाणी कपात होईल. या कारणाने, या कालावधीत भांडुप संकुलद्वारे होणाऱया पश्चिम उपनगरे, शहर भागातील लालबाग ते शीव वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील कुर्ला व घाटकोपर विभागात होणाऱया पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

पाण्याचा साठा करून ठेवा -
या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, पाणी कपातीच्या काळात काटकसरीने पाणी वापरुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - National Monetisation Pipeline कायदेशीर आणि संघटित लूट - काँग्रेसचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.