मुंबई: 'चारधाम यात्रा हेलिकॉप्टरने करा', Chardham Yatra by helicopter अशी वेबसाईटच्या माध्यमातून फसवी जाहिरात प्रसारित करून मुंबईतील पायधुनी परिसरातील एक व्यापाऱ्याला लुटण्यात trader Cheating in the name of Chardham Yatra आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 'चारधाम ट्रैवल्स' या नावाने बनावट वेबसाईट fake website of Chardham Travels तयार करण्यात आली होती. पवनहंस या कंपनीचे आपण कर्मचारी असून या कंपनीच्या माध्यमातून चार धाम यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून यात्रा घडवली जाते. वेबसाईटवरील या जाहिरातीला ५० वर्षीय व्यापारी राधेश्याम खंडेलवाल Businessman Radheshyam Khandelwal हे बळी पडले.
पीएनआर नंबर पाठवून विश्वास जिंंकला अन् - या बनावट वेबसाईटवर अंशुमन साहू या नावाने व्यक्तीचा नंबर देण्यात आला होता. त्या व्यक्तीशी व्यापाऱ्याने संपर्क साधला. यावेळी त्यांनी प्रवास करणाऱ्यांचे आधार कार्ड, ई-मेल व्यापाऱ्यांकडून मागून घेतले. त्यानुसार 25 मे रोजी व्यापाऱ्यांनी आधार कार्ड आणि प्रवाशांचे सात नाव साहू याला पाठवली. यासोबतच साहू यांनी पाठवलेल्या अकाउंट नंबर वर ५४२५० रुपये देखील व्यापारी खंडेलवाल यांनी जमा केले. त्यानंतर अजून 13 जणांची नावे साहू याने सांगितलेल्या ई-मेलवर पाठवण्यात आली. यासोबतच त्यांचे आधार कार्डही ई-मेल करण्यात आले. यासाठी दिलेल्या अकाउंट नंबरवर १ लाख ७५० रुपये पाठवण्यात आले होते. त्यानंतर साहूने तक्रारदार खंडेलवाल यांना एक लिंक पाठवली. त्यावर तपासणी केली असता पीएनआर क्रमांकावरून प्रवाशांची नोंदणी झाली. त्यामुळे चार धाम यात्रेबाबतचे आपलं रजिस्ट्रेशन झालं अशी खात्री व्यापारी खंडेलवाल यांना पटली. जून महिन्यात चार धामची यात्रा व्यापारी खंडेलवाल आणि त्यांच्या मित्र परिवाराने केली.
बोगस कंपनी असल्याचे कळताच बसला धक्का - केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर पुढील दर्शन घेण्यासाठी ज्यावेळी व्यापारी आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्रपरिवार पोहोचले. त्यावेळी संबंधित प्रशासन व्यवस्थेने त्यांच्याकडे असलेली तिकीट बनावट असल्याचे सांगितले. तसेच "चार धाम ट्रॅव्हल्स" नावाची कोणतीही कंपनी रजिस्टर नसल्याचेही त्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं. सर्व प्रकार खंडेलवाल यांच्या लक्षात येताच त्यांनी अंशुमन साहू यांच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो नंबर बंद होता. त्यामुळे आपली फसवणूक झाली हे व्यापाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांनी यासंबंधीचा गुन्हा दाखल केला आहे. व्यापाऱ्यांकडून दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.