ETV Bharat / city

केवळ 17 दिवसांत राज्यात 1 लाख 22 हजार 43 घरांची विक्री, महिनाअखेरीस रेकॉर्ड ब्रेक गृहविक्रीची शक्यता - realestate news today

घरविक्रीचा हा आकडा आश्चर्यचकित करणारा पण त्याचवेळी मोठा दिलासा देणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत गृहविक्रीचा आकडा 2 लाखांच्या पुढे जात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

houses
houses
author img

By

Published : Dec 18, 2020, 1:10 PM IST

मुंबई - कोरोनाचा सर्वात मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला असल्याचे म्हटले जात असतानाच आता कोरोना काळातच याच क्षेत्राला सर्वात 'अच्छे दिन' आल्याचे चित्र आहे. कारण कधी नव्हे ते या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक घरविक्री होताना दिसत आहे. डिसेंबरच्या केवळ 17 दिवसांत राज्यात तब्बल 1 लाख 22 हजार 43 घरे विकली गेली आहेत. या घरविक्रीतून राज्य सरकारच्या तिजोरीत मुद्रांक शुल्काच्या रूपाने 954 कोटींची भर पडली आहे. घरविक्रीचा हा आकडा आश्चर्यचकित करणारा पण त्याचवेळी मोठा दिलासा देणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत गृहविक्रीचा आकडा 2 लाखांच्या पुढे जात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

एप्रिलमध्ये कोरोनाचा मोठा फटका

कोरोना काळात प्रकल्पाचे बांधकाम बंद होते, पण गृहविक्री-खरेदी आणि इतर व्यवहार ऑनलाइन सुरू होते. मुद्रांक शुल्क-नोंदणी ही ऑनलाइन होत होती. मात्र कोरोनाचा काळ असल्याने आणि आर्थिक मंदीचे सावट उभे ठाकल्याने याचा फटका बांधकाम क्षेत्राला ही बसला. घरविक्री प्रचंड घसरली. एप्रिलमध्ये राज्यात केवळ 778 घरे विकली गेली होती तर यातून केवळ 3 कोटी 11 लाख रुपये इतकाच महसूल मिळाला होता. इतिहासातील सर्वात कमी घरविक्री म्हणून याकडे पाहिले जात आहे.

सप्टेंबरपासून 'अच्छे दिन'ला सुरुवात

एप्रिलचा आकडा निराशाजनक ठरल्याने कोरोनाचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. तर यातून सावरण्यासाठी बांधकाम क्षेत्राला किमान दीड-दोन वर्षे लागतील असेही म्हटले जात होते. पण या सर्व शक्यता सप्टेंबरपासून खोट्या ठरू लागल्या. सप्टेंबरपासून घरविक्रीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आणि आता डिसेंबरमध्ये तर घरविक्रीने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे. सप्टेंबरमध्ये फेब्रुवारीनंतर पहिल्यांदा घरविक्रीचा आकडा 1 लाखांच्या पुढे गेला. सप्टेंबरमध्ये 1 लाख 19 हजार 834 घरे विकली गेली आणि यातून 763 कोटींचा महसूल मिळाला होता. हाच ट्रेंड पुढे सुरू राहिला. ऑक्टोबरमध्ये 1 लाख 30 हजार 955 घरे विकली गेली आणि यातून 931 कोटींचा महसूल मिळाला होता. तर नोव्हेंबरच्या केवळ 15 दिवसांत 77 हजार घरे विकली गेली होती तर यातून 589 कोटी महसूल जमा झाला होता. दरम्यान मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्याने या महिन्यात अर्थात मार्चमध्ये 85 हजार 003 घरे विकली गेली होती आणि यातून 1103 कोटींचा महसूल मिळाला होता. जूनमध्येही घरविक्री आणि महसूल तसा कमीच राहिला. जूनमध्ये 81 हजार 276 घरे विकली गेली आणि यातून 728 कोटी मिळाले. तर ऑगस्टमध्ये 82 हजार 12 घरे विकली आणि यातून 815 कोटी तिजोरीत जमा झाले. एकूणच सप्टेंबरपासून घरविक्री मोठ्या प्रमाणावर वाढू लागली.

सरकारच्या 'या' निर्णयामुळे रेकॉर्ड ब्रेक विक्री

डिसेंबरच्या केवळ 17 दिवसांत राज्यात 1 लाख 22 हजार 43 घरे विकली गेली आहेत. 2020मधील सर्वाधिक घरविक्री डिसेंबरच्या केवळ 17 दिवसात झाली असून हा आकडा निश्चितच आश्चर्यचकित करणारा आहे. तर 31 डिसेंबरपर्यंत हा आकडा 2 लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास डिसेंबर 2020 हे आतापर्यंतचे घरविक्रीचे सर्व रेकॉर्ड तोडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान ही घरविक्री वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यातील सर्वात पहिले कारण म्हणजे राज्य सरकारने ऑगस्ट अखेरीस मुद्रांक शुल्कात 3 टक्क्यांनी घट केली. 5 टक्क्यांवरून मुद्रांक शुल्क थेट 2 टक्के झाल्याने ही बाब मोठी दिलासादायक ठरली. तर लॉकडाऊनमध्ये घरे विकली न गेल्याने बिल्डर आर्थिक अडचणीत आल्याने त्यांनीही आता किंमती कमी केल्या आहेत. घरांच्या किंमतीवर भरमसाठ सूट देत इतरही सवलती दिल्या आहेत. काही बिल्डर तर स्वतः 2 टक्के मुद्रांक शुल्क भरत ग्राहकांचा भार हलका करत आहेत. परिणामी घरविक्री वाढत आहे. तर आता 1 जानेवारीपासून 2 टक्क्यांऐवजी 3 टक्के मुद्रांक शुल्क लागू होणार असून ही सवलत 31 मार्च 2021पर्यंत असणार आहे. 3 टक्के मुद्रांक शुल्क ही बाब ही दिलासा देणारी असणार आहे. त्यामुळे डिसेंबर 2020मध्ये घरविक्रीला आलेले अच्छे दिन मार्च 2021पर्यंत कायम राहतील, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महिना-घरविक्री-मुद्रांक शुल्क वसुली

फेब्रुवारी -1लाख30 हजार 955-931 कोटी रु.

मार्च -85 हजार 003-1103 कोटी रु.

एप्रिल -778-3 कोटी 11 लाख रु.

जून -81 हजार 276-728 कोटी रु.

ऑगस्ट - 82 हजार 012-815 कोटी रु.

सप्टेंबर-1 लाख 7 हजार 997-1519 कोटी

ऑक्टोबर -1 लाख 30 हजार 955-931 कोटी रु.

नोव्हेंबर -77 हजार 104-589 कोटी रु. (केवळ 15 दिवसात)

डिसेंबर -1 लाख 22 हजार 43-954 कोटी रु. (17 डिसेंबरपर्यंत)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.