मुंबई - राज्यात शनिवारी ( 6 मार्च 2021) रोजी 1 लाख 13 हजार 669 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या 62 हजार 342 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 45 ते 60 वयोगटातील 11 हजार 241 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
आजपर्यंत राज्यात 17 लाख 44 हजार 724 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात शनिवारी झालेल्या लसीकरणामध्ये 93 हजार 476 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस तर 20 हजार 193 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. राज्यात शनिवारी 1 लाख 13 हजार 669 जणांना लस देण्यात आली. शनिवारी 10 हजार 904 हेल्थवर्कर तर 8 हजार 989 फ्रंटलाईन वर्कर यांना लशीचा पहिला डोस दिला गेला. तसंच 17 हजार 225 हेल्थ वर्कर आणि 2 हजार 968 फ्रंटलाईन वर्कर यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. तर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 62 हजार 342 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
लसीकरणाची जिल्हानिहाय आकडेवारी
अहमदनगर -54,067
अकोला - 23,806
अमरावती- 35,452
औरंगाबाद- 49,753
बीड- 31,577
भंडारा- 20,728
बुलडाणा - 27,110
चंद्रपूर- 33,806
धुळे- 20,410
गडचिरोली- 18,369
गोंदिया- 23,688
हिंगोली- 13,074
जळगाव- 35,240
जालना- 22,920
कोल्हापूर-62,610
लातूर-29,713
मुंबई- 3,40,891
नागपूर- 84,661
नांदेड- 26,489
नंदुरबार- 22,445
नाशिक- 76,747
उस्मानाबाद- 16,696
पालघर- 42,798
परभणी- 17,656
पुणे-1,79,465
रायगड - 28, 610
रत्नागिरी-24,640
सांगली- 39,873
सातारा- 61,065
सिंधुदुर्ग-13,396
सोलापूर- 47,440
ठाणे- 1,38,254
वर्धा-28,950
वाशिम -13,957
यवतमाळ-38,368
राज्यात एकूण लसीकरण-17लाख 44 हजार 724