ETV Bharat / city

कोल्हापुरात कर्जवसुलीसाठी अश्लील भाषा, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काळे फासून काढली धिंड

तीन दिवसापूर्वी नंदवाळ येथील एका महिलेला बजाज फायनान्सच्या एका कर्मचाऱ्याकडून कर्जवसुलीसाठी फोन केला होता. त्यावेळी त्या महिलेने पैसे नसल्याचे सांगताच कर्मचाऱ्यांकडून त्या महिलेला उद्धट व अश्लील भाषा वापरली.

author img

By

Published : Aug 14, 2020, 6:11 PM IST

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर - बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी अश्लील भाषा वापरल्याच्या निषेधार्त संतप्त झालेल्या महिलांनी बजाज कार्यालयावर मोर्चा काढला. आक्रमक झालेल्या महिलांना आज कर्मचाऱ्यांना काळे फासत त्यांची रस्त्यावरून धिंड काढली. छत्रपती महिला शासन या संघटनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते.

कोल्हापूर

तीन दिवसापूर्वी नंदवाळ येथील एका महिलेला बजाज फायनान्सच्या एका कर्मचाऱ्याकडून कर्जवसुलीसाठी फोन केला होता. त्यावेळी त्या महिलेने पैसे नसल्याचे सांगताच कर्मचाऱ्यांकडून त्या महिलेला उद्धट व अश्लील भाषा वापरली. त्यामुळे ती महिला नैराश्यात जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. ही बाब त्या महिलेने छत्रपती शासन या संघटनेला कळवली. याचा जाब विचारण्यासाठी आज संतप्त झालेल्या महिला बजाज फायनान्सच्या रेल्वे फाटक येथील कार्यालयावर चालून गेल्या. कार्यालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्याला बोलावून घ्या, अशी मागणी महिलांनी केली. मात्र, वारंवार फोन करून देखील कर्मचारी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी अन्य कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर त्यांची रस्त्यावरून धिंड काढली. झालेल्या या प्रकारामुळे कर्मचारीदेखील गोंधळून गेले, तसेच कार्यालयातील आणि परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बंद होते.

हेही वाचा - कोल्हापुरातील 'या' कला शिक्षकाने साकारले जगातले सर्वात लहान आकाराचे शिवरायांचे चित्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.