ETV Bharat / city

हिवाळा सुरू झालाय, 'अशी' घ्या आपल्या त्वचेची काळजी... त्वचारोग तज्ज्ञांची विशेष मुलाखत - Dermatologist's advice

कोल्हापूरातील त्वचातज्ज्ञ डॉ. कल्याणी काटकर-बाबर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक ऋतूत आपल्याला त्वचेची विशेष काळजी घ्यायला लागले. त्यामध्ये विशेष करून हिवाळ्यात. कारण हिवाळ्यात वातावरणातील ह्यूमीडिटी कमी होते. त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते त्यामुळेच त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. यावर उपाय त्यांनी सांगितले आहेत.

Winter has started, how to take care of skin; Exclusive Interview with Dermatologist
ईटीव्ही भारत विशेष : हिवाळा सुरू झालाय, 'अशी' घ्या आपल्या त्वचेची काळजी...
author img

By

Published : Nov 11, 2021, 3:38 AM IST

कोल्हापूर - हिवाळा सुरू झाला की सर्वांना एकच चिंता सतावत असते ती म्हणजे, त्वचेची काळजी कशी घ्यावी? हिवाळ्यात सर्वांचीच त्वचा कोरडी पडत असते. त्यामुळे यावर उपाय म्हणून आपण काय करू शकतो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. म्हणूनच याबाबत आज आपण काही हटके गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी यासह अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत. पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट..

हिवाळा सुरू झालाय, 'अशी' घ्या आपल्या त्वचेची काळजी... त्वचारोग तज्ज्ञांची विशेष मुलाखत

हिवाळ्यात त्वचेची काळजी का घेतली पाहिजे ?

कोल्हापूरातील त्वचातज्ज्ञ डॉ. कल्याणी काटकर-बाबर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक ऋतूत आपल्याला त्वचेची विशेष काळजी घ्यायला लागले. त्यामध्ये विशेष करून हिवाळ्यात. कारण हिवाळ्यात वातावरणातील ह्यूमीडिटी कमी होते. त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते त्यामुळेच त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. त्वचा कोरडी पडल्याने ती अधिकच सेन्सिटिव्ह बनायला सुरुवात होत असते. म्हणूनच इतर ऋतूंपेक्षाही हिवाळ्यात आपल्याला त्वचेची काळजी घ्यावी लागते असे त्या म्हणाल्या.

थंडीमध्ये अंघोळ करताना जास्त गरम पाणी वापरू नये -

हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने सर्वजणच सकाळी आंघोळ करताना अगदी गरम पाणी वापरत असतात मात्र असे करू नये. शिवाय जास्त वेळ अंघोळ करतात ते सुद्धा करू नये. कारण यामुळे जास्त प्रमाणात शरीरातील पाण्याची प्रमाण कमी होते आणि आपली त्वचा आणखीनच कोरडी पडायला सुरुवात होते. त्यामुळे अगदी कोमट पाणी वापरले तरी चालेल शिवाय केवळ 5 ते 6 मिनिटांतच अंघोळ व्हायला हवी. शिवाय आंघोळीनंतर टॉवेल ने जोर लावून अंग पुसू नये. टॉवेलने केवळ हलक्या हाताने अंग पुसून घ्यायला हवे अशी माहिती सुद्धा डॉ. कल्याणी काटकर-बाबर यांनी दिली. विशेष म्हणजे अंघोळीपूर्वी अभ्यंगस्नानाप्रमाणे अंगाला तेल लावून अंघोळ केली तर अधिक फायदेशीर राहते असेही त्या म्हणाल्या.

थंडीत मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे -

प्रामुख्याने थंडी सुरू झाली की मॉइश्चरायझरची सर्वांना गरज पडते. मात्र, कोणत्या पद्धतीचे मॉइश्चरायझर वापरावेत आणि कधी वापरायला हवे याबाबत अनेकांना माहिती नसते. याबाबतच माहिती देताना डॉ. काटकर-बाबर म्हणाल्या, दररोज आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावले पाहिजे. मॉइश्चरायझर नसेल तर तेलाचा सुद्धा वापर करू शकतो. मात्र हे आंघोळीनंतर लगेचच वापरावे असेही त्या म्हणाल्या कारण, आपल्याला extrenal मॉइश्चरायझर ची गरज नसते मात्र आपल्या शरीरात जे पहिल्यापासूनच मॉइश्चर असते ते कमी होऊ नये यासाठी आपण मॉइश्चरायझर चा वापर करायचा असतो.

कशा पद्धतीने मॉइश्चरायझर निवडावे?

इतर ऋतूंच्या तुलनेत थंडीमध्ये मॉइश्चरायझर (लोशन)ची सर्वांनाच गरज भासते मात्र हे निवडत असताना कोणत्या पद्धतीचा घ्यावा याबाबत अनेक शंका उपस्थित होत असतात. त्यामुळे मॉइश्चरायझर घेताना नॉर्मल त्वचा, आणि कॉम्बिनेशन त्वचा असेल तर मॉइश्चरायझर लोशन पद्धतीचे असले पाहिजे. जर आपली त्वचा तेलकट असेल तर जेल पद्धतीचे मॉइश्चरायझर असायला हवे आणि कोरडी त्वचा असेल तर क्रीम पद्धतीचे मॉइश्चरायझर (लोशन) वापरावे.

ओठ आणि ताचेची काळजी कशी घ्यावी -

त्वचेबरोबरच ओठ फुटण्याची सुद्धा समस्या अनेकांना जाणवते. त्यामुळे अशा वेळी व्हॅसलिन किंव्हा पेट्रोलियम जेलीचा थेट वापर सर्वजण करतो. मात्र असे न करता दररोज आंघोळीनंतर आपले ओठ रुमालाने हलक्या हाताने पुसून घेतले पाहिजेत. जेणे करून ओठांवरील मृत त्वचा निघून जाईल. त्यानंतर त्यावर मॉइश्चरायझर लावून त्यावर पेट्रोलियम जेली जेवणे अधिक योग्य असल्याचेही. शिवाय टाचांची काळजी सुद्धा घेताना दररोज सायंकाळी जर गरम पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवुन त्यानंतर एका सुती कापडाने पुसून घ्यायला हवे. त्यावर बाजारात विशेष करून पायांसाठी आणि टाचेसाठी 'फूट क्रीम' मिळत असतात त्या वापराव्यात. त्यानंतर रात्री झोपताना त्यावर पायमोजे घालून झोपले तर अधिकच फायदेशीर असते.

प्राणायाम त्वचेसाठी योग्य -

त्वचेची काळजी घेत असताना बाजारात मिळणाऱ्या वस्तूंचा वापर करू शकतोच मात्र दररोज प्राणायाम केला तर शरीरासाठी अधिक उत्तम असते. त्यामुळे दररोज प्राणायाम केल्यास त्याचे विविध फायदे असतात.

या गोष्टी सुद्धा 'टाळा'

उन्हाळ्यात सन प्रोटेक्टेड क्रीम आपण वापरत असतो. मात्र हिवाळा सुरू झाला की, सन प्रोटेक्टेड क्रीम वापरायची बंद करतो. असे न करता थंडीमध्ये सुद्धा थेट उन्हात जाणार असाल तर सन प्रोटेक्टेड क्रीमचा वापर करा असेही डॉ. काटकर बाबर यांनी आवाहन केले. शिवाय थंडीत गरम म्हणजेच स्वेटर वगैरे कपडे वापरत असताना ती थेट न घालता. त्यामध्ये इतर कपडे घालून त्यावर स्वेटर वापरावे त्याचा शरीरासाठी अधिक फायदा होतो असेही त्या म्हणाल्या.

पुरुषांनी सुद्धा आपल्या त्वचेची काळजी घ्यावी -

सर्वच स्त्रिया विशेष करून मुली आपल्या त्वचेची तसेच चेहऱ्याची काळजी घेत असतात. हजारो रुपये यावर खर्च करताना पाहायला मिळतात. मात्र या तुलनेत पुरुष आपल्या त्वचेची चेहऱ्याची काळजी घेत नाहीत. असे न करता त्यांनी सुद्धा आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. शिवाय आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन त्वचेबाबत काही तक्रारी असतील तर मार्गदर्शन घेऊन त्यावर उपचार सुद्धा घ्यायला हवे असेही डॉ. कल्याणी काटकर-बाबर म्हणाल्या.

हेही वाचा - काही लोक इतरांच्या तुलनेत लवकर बरे कसे होतात? या संशोधनातून मिळू शकते उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.