ETV Bharat / city

गुप्तांग कापून पत्नीने केली पतीची हत्या; शाहूवाडी तालुक्यातील घटना - Wife cuts off genitals and kills husband

गुप्तांग कापून तसेच गळा आवळून दारूच्या नशेत असलेल्या पतीची पत्नीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातल्या शाहुवाडी तालुक्यातील नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे ही घटना घडली. वंदना प्रकाश कांबळे असे या पत्नीचे नाव असून प्रकाश पांडुरंग कांबळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

गुप्तांग कापून पत्नीने केली पतीची हत्या
गुप्तांग कापून पत्नीने केली पतीची हत्या
author img

By

Published : May 17, 2022, 6:36 AM IST

कोल्हापूर : सुरीने गुप्तांग कापून तसेच गळा आवळून दारूच्या नशेत असलेल्या पतीची पत्नीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातल्या शाहुवाडी तालुक्यातील नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे ही घटना घडली. वंदना प्रकाश कांबळे (वय 50) असे या पत्नीचे नाव असून प्रकाश पांडुरंग कांबळे (वय 52) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पतीच्या हत्येनंतर सुरुवातीला तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला नंतर पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुल केला. तिला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सालगडी म्हणून होते एकाच्या शेतावर कामावर - पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रकाश पांडुरंग कांबळे आणि त्याची पत्नी वंदना प्रकाश कांबळे दोघेही मूळचे शाहूवाडी तालुक्यातील लोळाणे गावचे आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते शाहूवाडी तालुक्यातीलच नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे एकाच्या शेतावर सालगडी म्हणून कामाला होते. याठिकाणी पती नेहमीच दारूच्या नशेत असायचा शिवाय पत्नीच्या अनैतिक संबंधावरून तिला नेहमी मारहाण करायचा. काल मध्यरात्री दारूच्या नशेत असताना पुन्हा तिला त्रास दिल्याने तिने त्याची निर्घृण हत्या केली. दगड्यावर डोके आपटून गळा आवळून आणि पतीच्या गुप्तांगावर सुरीने वार करून तिने निर्दयीपणे खून केला. या घटनेनंतर पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. शिवाय अधिक चौकशी सुरू आहे असेही पोलीस निरीक्षक विजय पाटील म्हंटले.

सुरुवातीला आत्महत्येचा बनाव; नंतर खुनाची कबुली - मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पत्नी वंदना कांबळे स्वतः शाहूवाडी पोलिसांत जाऊन हजर झाली आणि आपल्या पतीने आत्महत्या केली असल्याचे तिने माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह तपासणीसाठी मलकापूर येथे पाठवला तर त्या ठिकाणी पतीच्या डोक्यात मोठी जखम तसेच गुप्तांगावर सुरीने अथवा चाकूने वार केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबुल केला.

हेही वाचा - Unnatural sex in Jail: आर्थर रोड कारागृहात तरुणाने अनैसर्गिक संभोग केल्याचा प्रकार उघडकीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.