ETV Bharat / city

Maharashtra Sugarcane Production : ऊस उत्पादनामुळे जमिनींवर काय होईल परिणाम? वाचा सविस्तर...

author img

By

Published : May 18, 2022, 5:31 PM IST

ऊस उत्पादनात ( Sugarcane Production ) अनेक वेळा उत्तर प्रदेश अव्वल स्थानी असायचे. मात्र, यावर्षी सर्व रेकॉर्ड तोडून महाराष्ट्र पहिल्या ( Maharashtra Sugarcane Production ) स्थानी आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये कोल्हापूर विभागाने ( Kolhapur Division Sugarcane Production) राज्यात बाजी मारली असून राज्यातील एकूण उत्पादनाच्या 23 टक्के इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे.

Maharashtra Sugarcane Production
Maharashtra Sugarcane Production

कोल्हापूर - ऊस उत्पादनात ( Sugarcane Production ) अनेक वेळा उत्तर प्रदेश अव्वल स्थानी असायचे. मात्र, यावर्षी सर्व रेकॉर्ड तोडून महाराष्ट्र पहिल्या ( Sugarcane Production In Maharashtra ) स्थानी आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये कोल्हापूर विभागाने ( Kolhapur Division Sugarcane Production) राज्यात बाजी मारली असून राज्यातील एकूण उत्पादनाच्या 23 टक्के इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा जर आलेख पाहिला तर दरवर्षी ऊस शेती करण्याकडे अनेक शेतकरी वळत आहेत. त्यामुळे इथल्या जमिनींवर त्याचा काही परिणाम होईल का, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. शिवाय नेमकी काय काळजी घ्यायला हवी याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

प्रतिक्रिया

जमीन नापीक होण्याची प्रमुख कारणे - शेतकऱ्यांना कमी जागेत जास्त उत्पादन हवे आहे. त्यासाठी अनेक रासायनिक खतेही बाजारात उपलब्ध आहेत. हे करत असताना आपल्या जमिनीचे आरोग्य सुद्धा जपले पाहिजे, हे अनेकजण विसरतात. त्यामुळेच जमीन नापीक होण्याची अनेक कारणे सांगता येतील त्यातील प्रमुख कारणे म्हणजे वारंवार एकच पीक घेणे पिकांची फेरपालट न करणे, पाण्याचा अतिरिक्त वापर करणे, रासायनिक खते तसेच कीटकनाशकांचा अति वापर, सेंद्रिय खतांचा अभाव, प्रबोधनाचा अभाव ही कारणे नेहमीच सांगितली जातात. ऊस पीक सुद्धा एकसारखे घेतले जात असून ते सुद्धा एकसारखे न घेता एखाद्या वर्षी वेगळे पीक घेतले पाहिजे, असे ऊस अभ्यासक पी. जी. मेढे यांनी म्हटले.

'म्हणून' शेतकरी ऊस शेतीकडे वळला - इतर पिकांच्या तुलनेत काही प्रमाणात कमी कष्टाची शेती आणि हमखास हमीभाव असलेले पीक म्हणून ऊस शेतीकडे पाहिले जाते. इतर कोणत्याही पिकाला हमीभाव नाही, त्यामुळे शेतकरी याकडे वळला आहे. शिवाय याचा आलेख वाढतच चालला आहे. ऊस उत्पादन वाढल्याने त्याचा शेतीला आणि पर्यायाने जमिनीला सुद्धा फटका बसल्याची भीती अनेकजण व्यक्त करत आहेत. ऊस पीकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. अनेकजण तर रात्री पाणी लावून जातात. रात्रभर उसाच्या शेतीला पाटातून पाणी पाजले जाते. त्यामुळे जमिनीतील अनेक घटक वाहून जातात असे मेढे यांनी म्हटले. शिवाय पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर यामध्ये दिसतो. अतिरिक्त पाणी दिल्याने उसाच्या उत्पादनात वाढ नाही तर उलट घटच होते. शिवाय जमिनीतील क्षराचे सुद्धा प्रमाण वाढते जे पुढे जाऊन जमीन क्षारपड होण्याचा सुद्धा धोका असतो. त्यामुळे यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. ज्या पारंपरिक पद्धती आहेत, त्यामध्ये आता बदल करून सुधारणा गरजेची आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणेच योग्य आहे. विशेष म्हणजे दर दोन तीन वर्षांनी पीक बदललेच पाहिजे, असे काही नाही. मात्र, जर योग्य सल्ला घेऊन जमिनीची काळजी घेतली तर निश्चितच आपल्या जमिनीचा पोत सुधारेल, असेही मेढे म्हणाले.

हेही वाचा - Melghat Water Crisis : मेळघाटातील नागरीक गढूळ पाण्याने त्रस्त; खासदार मात्र हनुमान चालिसा म्हणण्यात व्यस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.