कोल्हापूर - आपण सर्वांनी लग्नाच्या विविध पद्धतीने वरात निघाल्याचे पाहिले असेल वाचले असेल. मात्र कोल्हापुरातल्या पाणी टंचाईवर ( Water scarcity ) लक्ष वेधण्यासाठी नवदांपत्याने ( newlyweds ) चक्क पाण्याच्या टँकर वरून वरात काढल्याची घटना घडली आहे. अभिनव पद्धतीने पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित करत या नवदांपत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाय जोपर्यंत गल्लीतील पाणीटंचाईचा प्रश्न मिटत नाही ( no honeymoon until water problem solved ) तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही.
अशी निघाली अनोखी वरात - कोल्हापूर शहरातल्या मंगळवार पेठ येथील विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे आज विवाहबद्ध झाले. त्यानिमित्ताने त्यांची आज महाद्वार रोड मिरजकर तीकटी खासबाग परिसरातून अभिनव पद्धतीने हलगी लेझीम गुनक्याच्या तालावर वरात काढण्यात आली. गल्लीतील पाणी टंचाईच्या प्रश्नावरून त्यांनी ही अनोखी वरात काढण्याचे ठरवले. यामध्ये पाण्याच्या टँकरवर वधू वर बसले होते. त्यांच्या मागे मोठा फलक होता. ज्यावर महापालिकेच्या नळाला नियमित पाणी येत नाही, म्हणून बायकोला त्रास नको, म्हणूनच आम्ही पाण्याचा टँकर घेतला असा लक्षवेधी मजकूर लिहण्यात आला होता.
तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही - टँकरच्या पुढे महिला, मुले डोक्यावर रिकाम्या घागरी घेऊन हलगीच्या तालावर नाचत होते. त्या पाण्याच्या टँकरवर आणखीन एक लक्षवेधी वाक्य दिले होते. जोपर्यंत खासबाग परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही. अशी वाक्ये टँकरवर लिहून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ही लग्नाची वरात रात्री उशिरा नवरदेवाच्या गल्लीत पोचल्यावर नवदांपत्यांनी टँकरची पाईप हातात घेऊन ते घरात पाणीपुरवठा केला. या मिरवणुकीचे संयोजन सचिन साबळे, अमित पोवार, रमेश मोरे, अभिजीत पोवार, संजय पिसाळे, संदीप पोवार, स. ना. जोशी, अशोक पोवार आदी कार्यकर्त्यांनी केले.
हेही वाचा - Blood Donation From a Dog: एका कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याचे रक्तदान करून वाचवले प्राण