कोल्हापूर - बेळगावचे जिल्हाधिकारी चार ते पाच एकर जागा देत असतील तर मराठी भाषिकांसाठी हैदराबादच्या धर्तीवर महाविद्यालय उभारण्याचा मानस आहे. सद्या फक्त चाचपणी केली असून कोणत्याही निर्णयापर्यंत आलो नसल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे, ते कोल्हापुरात बोलत होते.
नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी एकदा भूमिका स्पष्ट केली असून हा प्रकल्प कोकणात होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केअर ऑफ पब्लिक सेफ्टीचे डॉ. अभिषेक हरिदास यांनी माजी शिक्षणमंत्र्यांच्या पदवीबद्दल शंका उपस्थित केली होती. शिवाय उदय सामंत यांच्या पदवीबद्दल सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली. याबाबत विचारले असता उदय सामंत म्हणाले, ते पाच वर्षे राहिले आणि आता माझ्या पदवीबद्दल शंका उपस्थित केली. मी सुद्धा पाच वर्षे राहणार आहे.