ETV Bharat / city

Police Accepting Bribe : कोल्हापुरात 10 लाखांची लाच घेताना LCB चे दोन कॉन्स्टेबल जाळ्यात

10 लाखांची लाच (Bribe) घेताना कोल्हापुरात एलसीबीचे (Kolhapur LCB Constable) दोन कॉन्स्टेबलला एसीबीने (Kolhapur ACB) पकडले आहेत. शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली.

Two LCB constables arrested
लाच घेताना दोन पोलिसांना अटक
author img

By

Published : Jan 21, 2022, 5:03 PM IST

Updated : Jan 21, 2022, 5:45 PM IST

कोल्हापूर - पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील दोन कॉन्स्टेबल (LCB Constable) दहा लाख रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) अँटी करप्शनच्या (Kolhapur ACB) जाळ्यात सापडले आहेत. मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देऊन 25 लाख रुपयाची लाच मागितली होती. त्यातील दहा लाख रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले असून, पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

माहिती देताना एसीबी अधिकारी आणि तक्रारदार

तक्रारदार हा वकील असून त्याच्या मुलाचा कार तसेच दुचाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. वकीलांचा मुलगा हा आठ दिवसांपूर्वी मुंबईतील पनवेल येथून जुन्या वापरातील यामाहा R1 स्पोर्ट्स बाईक खरेदी करून कोल्हापुरात आणली होती. त्यातील दुचाकी भंगारमध्ये काढण्यासाठी त्यांनी रितसर परवानगी देखील घेतली होती. मात्र ही गाडी चोरीची असल्याचे सांगून सदरचे आरोपी विजय कारंडे आणि किरण गावडे या दोघांनी तक्रारदाराच्या मुलाला तू मुंबई, पुण्यातून दुचाकी चोरून आणून कोल्हापुरात विकतो काय असा जाब विचारत मोटरसायकल घरातून घेऊन गेले. मात्र सर्व कागदपत्र दाखवले असता ही गाडी चोरीची नसल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तरीही तू बोगस स्मार्ट कार्ड बनवतो असे कारण सांगून सदरच्या वकिलांच्या मुलावर मोक्का गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती घालत बदनामी करण्याची धमकी दिली. ही कारवाई टाळण्यासाठी एकूण 25 लाख रुपयांची मागणी सदर आरोपींनी तक्रारदाराकडे केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली असता, एसीबीने सापळा रचत लाचेमधील 25 लाखापैकी दहा लाख रुपये स्वीकारताना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस हवालदार विजय केरबा कारंडे ( उचगाव , चौगुले पार्क ) व पोलीस नाईक किरण धोंडीराम गावडे ( केदार नगर, मोरेवाडी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.

शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली असून संशयित कॉन्स्टेबल विरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

  • पोलीस अधीक्षक कार्यालयासोमोरच कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ: -

सदरच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. हे दोन्ही कॉन्स्टेबल वरिष्ठांची मर्जीमधले असून त्यांना कायम स्थानिक गुन्हे शाखा कशी काय मिळते असा सवाल काही पोलिसांनी उपस्थित केला आहे. दहा लाख रुपयांची दोन कॉन्स्टेबल लाच घेताना अडकल्यामुळे पोलीस दलामध्ये एकच चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये अन्य कोण वरिष्ठ अधिकारी आहेत का त्याचा तपास एसीबीचे अधिकारी करत आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

  • यांनी केली कारवाई -

सदरची कारवाई अँटी करप्शन ब्युरो पुणे पोलीस उपआयुक्त/ पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, ACB अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ACB अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्यान ब्युरो कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, विकास माने, सुनिल घोसाळकर, नवनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल मयुर देसाई, रूपेश माने, सुरज अपराध, अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी केली आहे.

हेही वाचा - Kolhapur ACB Trap : कोल्हापुरात साडे पाच लाखांची लाच घेताना प्रांताधिकारी, सरपंच अडकले एसीबीच्या जाळ्यात

Last Updated : Jan 21, 2022, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.