कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आज (मंगळवारी) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता उत्तरच्या रिंगणात एकूण 15 उमेदवार उरले असून त्यांच्यात लढत होणार आहे. यामध्ये खरी लढत मात्र काँग्रेसच्या जयश्री चंद्रकांत जाधव आणि भाजपाचे सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यात होणार आहे.
यांनी घेतले अर्ज मागे : एकूण 17 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते त्यातील दोघांनी अर्ज मागे घेतले असल्याने 15 जण रिंगणात उरले आहेत. अर्ज मागे घेतलेले दोघे पुढीलप्रमाणे : 1) अस्लम सय्यद (अपक्ष), 2) संतोष गणपती बिसुरे (अपक्ष)
उरलेल्या 15 उमेदवारांची नावं पुढीलप्रमाणे :
मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांचे उमेदवार : 1) जयश्री चंद्रकांत जाधव (काँग्रेस, चिन्ह - हात)
2) सत्यजित उर्फ नाना कदम (भाजपा, चिन्ह - कमळ)
नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार : 3) यशवंत शेळके (चिन्ह - कप बशी)
4) विजय केसरकर (चिन्ह - ऑटो रिक्षा)
5) शाहीद शेख (चिन्ह - गॅस सिलेंडर)
इतर उमेदवार : 6) सुभाष देसाई (चिन्ह - सोड रोलर)
7) बाजीराव नाईक (चिन्ह - एअर कंडिशनर)
8) भारत भोसले (चिन्ह - कपाट)
9) मनीषा कारंडे (चिन्ह - दूरदर्शन)
10) अरविंद माने (चिन्ह - कॅरम बोर्ड)
11) अजीज मुस्ताक (चिन्ह - हेलिकॉप्टर)
12) करुणा मुंडे (चिन्ह - शिवण यंत्र)
13) राजेश नाईक (चिन्ह - किटली)
14) राजेश कांबळे (चिन्ह - शिट्टी)
15) संजय मागाडे (चिन्ह - सफरचंद)
हेही वाचा - Aditya Thackeray On Nanar Project : लोकांचा भरोसा जिंकून पुढे जाऊ - आदित्य ठाकरे