ETV Bharat / city

Triathlon Marathon : कोल्हापुरात देशपातळीवरील स्पर्धेचे आयोजन; देशभरातून सुमारे हजार स्पर्धक सहभागी

देशात अनेक खेळाडू आहेत जे वेगवेगळ्या खेळात नेहमी सहभागी होतात. अशीच एक स्पर्धा कोल्हापुरात डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने भरवण्यात आली आहे. ही स्पर्धा देशपातळीवर भरवण्यात आली असून आज (दि. 30 जानेवारी) सकाळी 6 वाजता बर्गमॅन ट्रायथलॉन मॅरेथॉन ( Triathlon Marathon ) स्पर्धा सुरू झाली आहे. यामध्ये 3 खेळांचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेत देशभरातून सुमारे एक हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 30, 2022, 4:08 PM IST

कोल्हापूर - मागील अडीच वर्षांपासून देशात कोरोनाचे संकट सुरू आहे. अशात प्रत्येकाला आपल्या शरीराची काळजी घेणे किती गरजेचे आहे आणि व्यायमाचे महत्त्व पटले आहे. देशात अनेक खेळाडू आहेत जे वेगवेगळ्या खेळात नेहमी सहभागी होतात. अशीच एक स्पर्धा कोल्हापुरात डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने भरवण्यात आली आहे. ही स्पर्धा देशपातळीवर भरवण्यात आली असून आज (दि. 30 जानेवारी) सकाळी 6 वाजता बर्गमॅन ट्रायथलोन-मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली आहे. यामध्ये 3 खेळांचा समावेश करण्यात आला आहेत. या स्पर्धेत देशभरातून सुमारे एक हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला.

कोल्हापुरात देशपातळीवरील स्पर्धेचे आयोजन

धावणे ( Running ) , पोहणे ( Swimming ), सायकलिंग ( Cycling ) या प्रकारात ही स्पर्धा पार पडत असून 9 तासांच्या अवधीमध्ये एकाच खेळाडूने हे तीन इव्हेंट पूर्ण करणे हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असते. एकूण 95 किमी अंतराची ही स्पर्धा पार करताना खेळाडूंचा चांगलाच कस लागतो. कोरोनानंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात ( Rajaram Lake Area ) पार पडत आहे.

असे असते स्पर्धेचे स्वरूप - ही एक जगातील सर्वात अवघड स्पर्धा मानली जाते. ज्यामध्ये 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकल चालवणे व 21.1 किलोमीटर धावणे, अशी ही स्पर्धा असते. सर्व सहभागी स्पर्धकाला 9 तासांत ही स्पर्धा पूर्ण करायची असते. यामध्ये 500 खेळाडू सहभागी झाले आहेत. छोटी वर्गवारीही केलेली असते. ज्यात ओलंपिक ट्रायथलॉन ( Olympic Triathlon ), स्प्रिंग ट्रायथलॉन ( Spring Triathlon ) असते. सध्या या स्पर्धेत एक हजार खेळाडू सहभागी असून मोठ्याचे कॅटेगरीमध्ये 1.9 स्विमींग, 90 सायकलिंग 21.1 रनिंग मध्ये तब्बल 500 खेळाडू सहभागी झाले आहेत. सर्व स्पर्धक स्वतःची सायकल आणतात. या सर्व सायकली खूप महागड्या असतात. ही स्पर्धा जे सतत सराव करत असतात तेच पूर्ण करू शकतात.

स्पर्धकांचा देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद - कोरोनाचा प्रसार वाढल्यापासून मैदाने, जलतरण तलाव बंद होते. मात्र, आता सर्व सुरू होते असल्याने व कोल्हापुरात चांगली व्यवस्था असल्यामुळे ही स्पर्धा कोल्हापुरात भरवण्यात आली. स्पर्धकांचा सहभाग पाहून आयोजकांनी आनंद व्यक्त केला. हे सर्व खेळ नवीन असल्याने लोकांचा कल याकडे कमी असतो. मात्र, जास्तीत जास्त खेळाडू यावेत, याची माहिती लोकांना कळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. पुढेही अशा स्पर्धा पुणे, गोवा, दाजीपूरमध्ये होणार असून दाजीपूर येथील होणारी स्पर्धा ही देशातील सर्वात अवघड स्पर्धा असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

खेळाडूंनी घरीच केला सराव - या स्पर्धेतील अनेक खेळाडू हे पोलीस, डॉक्टर, इंजिनिअर तसेच मोठ्या पदावर काम करणारे अधिकारी आहेत. मागील अडीच वर्षांपासून हे सर्व खेळाडू या देशपातळीरील स्पर्धेचे वाट पाहत होते. मात्र, कोरोनामुळे ही स्पर्धा घेणे शक्य होत नव्हते. यामुळे अनेक खेळाडूंचा घरातच नियमित सराव सुरू होता, असे काही स्पर्धकांनी सांगितले.

हेही वाचा - अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार : राज्यमंत्री आदिती तटकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.