कोल्हापूर - नववर्षाच्या स्वागतासाठी नागरीक पर्यटनस्थळी वेळ घालवण्यास प्राधान्य देतात. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील राधानगरी धरण परिसरातही पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, पर्यटकांनी यावेळच्या नववर्षाच्या स्वागतासाठी राधानगरीची निवड केली असेल तर त्यांना ती रद्द करावी लागणार आहे. कारण राधानगरी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे 30 डिसेंबरपासून 1 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जंगल, धरण आणि बॅक वॉटर परिसरात कोणीही पार्टी करताना आढळल्यास यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे.
सर्वच ठिकाणी विविध विभागाची पथके तैनात -
राधानगरी धरण, बॅक वॉटर क्षेत्रात पार्टी करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जंगल परिसरात कोणीही पार्टी करून अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस, वन्यजीव विभाग, पाटबंधारे विभागाचे पथक नागरिकांवर लक्ष ठेवून असणार आहेत. जंगल, धरण परिसर आणि बॅकवॉटर परिसरात कुणीही जेवण करताना आढळून आल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई होणार आहे.
नव वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना राधानगरी परिसरात ३ दिवस प्रवेश बंद - new year celebration
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक पर्यटनस्थळावर गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याच प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण परिसरातील पर्यटन स्थळावरदेखील नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.