कोल्हापूर - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी कोल्हापुरात एकूण ४० हून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या १७९ वर पोहोचली आहे. गेल्या दहा दिवसांपासून दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत आहे.
जिल्ह्यातील एकूण १७९ रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण शाहूवाडी तालुक्यातील आहेत. तर सर्वात कमी रुग्ण हातकणंगले आणि कागल तालुक्यात प्रत्येक 1 इतके आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.
तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
- आजरा- ११ भुदरगड- १८ चंदगड- ६ गडहिंग्लज- ५ गगनबावडा- २ हातकणंगले- १ कागल- १ करवीर- ११ पन्हाळा- १३ राधानगरी- ३३ शाहूवाडी- ५० शिरोळ- ५ नगरपरिषद क्षेत्र- ६ कोल्हापूर महापालिका क्षेत्र- १३
असे एकूण १७५ आणि पुणे-१, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील एकूण ४ असे मिळून कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १७९ वर पोहोचली आहे.