कोल्हापूर - कोरोनामुळे राज्यभरातील नाट्यगृह अद्याप बंद आहेत. त्यामुळे नाट्य कलाकारांच्या मध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील नाट्यगृह सुरू करावेत अशी मागणी आता नाट्य कलाकारांमधून होत आहे. या मागणीसाठी आज कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव नाट्यगृहासमोर कलाकारांनी मूक आंदोलन केले. राज्य सरकारने नाट्यगृह त्वरित सुरू करून आर्थिक पॅकेज लवकर जमा करावे. अशी मागणी त्यांनी केली आहे.
नाट्यकलाकारांचे मूक आंदोलन कोरोनामुळे राज्यातील नाट्यग्रह गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम न झाल्याने कलाकारांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने नाट्यगृह त्वरित सुरू करावीत या मागणीसाठी आज कोल्हापुरात रंगकर्मी आंदोलन पार पडले. कोल्हापुरातील नाट्य कलाकारांनी एकत्र येऊन संगीतसूर्य केशवराव नाट्यगृह येथे मूक आंदोलन करत राज्य सरकारच्या कोरोणाचा निषेध केला. राज्य सरकारने त्वरित नाट्यगृह सुरू करून कलाकारांना आर्थिक मदत घोषित केलेली तात्काळ जमा करावी. अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. राज्य सरकारने तात्काळ या मागणी संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी नाट्य कलाकारांनी केली आहे.
राज्य सरकारची मदत तुटपुंजी
राज्यातील नाट्य कलाकारांना राज्य सरकारने पाच हजार इतकी मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असल्याचे मत अनेक कलाकारांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारने हे मदत तात्काळ जमा करावी. अशी मागणी अनेक कलाकारांकडून होत आहे.