ETV Bharat / city

अंबाबाई मंदिर किरणोत्सव सोहळा; पहिल्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत - sunlight on feet of mahalaxmi

अंबाबाई मंदिरामधला दक्षिणायनातील किरणोत्सव सोहळा आज पासून सुरू झाला आहे. किरणोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीच्या गुडघ्यापर्यंतचा भाग उजळून टाकला.

अंबाबाई मंदिर किरणोत्सव सोहळा
अंबाबाई मंदिर किरणोत्सव सोहळा
author img

By

Published : Nov 9, 2020, 8:17 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरातल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामधला दक्षिणायनातील किरणोत्सव सोहळा आज पासून सुरु झाला आहे. किरणोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीच्या गुडघ्यापर्यंतचा भाग उजळून टाकला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेश बंद असल्याने भाविकांना हा सूर्य किरणोत्सावाचा सोहळा अनुभवता येत नाही.

आज सायंकाळच्या वेळी सूर्यकिरणे 5 वाजून 31 मिनिटांनी कासव चौकात आली. त्यानंतर पाच वाजून 43 मिनिटांनी किरणांनी गर्भ कुटीत प्रवेश केला. पाच वाजून 45 मिनिटांनी किरणांनी देवीचा चरण स्पर्श करत पुढे ती गुडघ्यापर्यंत जाऊन डाव्या बाजूला लुप्त झाली. वास्तुशास्त्राच्या या अद्भुत किमयेची अंबाबाई मंदिरातील ही प्रत्यक्ष अनुभूती नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या दक्षिणायन आणि जानेवारी महिन्यातील उत्तरायणातील किरणोत्सव सोहळ्यात पाहता येते. हा सोहळा पाहण्यासाठी प्रतिवर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते असते. यंदा मात्र, कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांचा थोडासा हिरमोड झाला आहे.

अंबाबाई मंदिर किरणोत्सव सोहळा;
किरणोत्सव सोहळा ऑनलाईन पाहता येणार - दरवर्षी कोल्हापुरात अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी देशभरातील भाविक येत असतात. मात्र यावर्षी भक्तांना मंदिर बंद असल्याने प्रत्यक्षात या सोहळ्याचा आनंद घेता येणार नाहीे. मात्र, वर्षातून दोनवेळाच हा सोहळा पाहता येत असल्याने भाविकांच्या कुतूहलाचा विचार लक्षात घेऊन मंदिर समितीने त्यांना हा किरणोत्सवाचा आनंद घरबसल्या घेता यावा यासाठी थेट प्रक्षेपणाची सोय केली आहे. भाविकांना घरबसल्या फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच युट्युब वरूनहा सोहळा पाहता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.