ETV Bharat / city

Students Protest in Kolhapur : परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा रद्द करा; कोल्हापुरातील विद्यार्थी आक्रमक - कोल्हापुरात विद्यार्थ्यांचे आंदोलन

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (Offline Exam) पद्धतीने घेण्यात येणार असल्याने कोल्हापुरातील विद्यार्थी आक्रमक (Students Protest in Kolhapur) झाले आहेत. शिवाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात किंवा रद्द कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Students Protest
कोल्हापुरात विद्यार्थ्यांचे आंदोलन
author img

By

Published : Jan 31, 2022, 5:44 PM IST

Updated : Jan 31, 2022, 6:16 PM IST

कोल्हापूर - कोरोनाचा शिक्षण क्षेत्राला (Corona Effect on Education) मोठा फटका बसला आहे. बहुतांश अभ्यासक्रम हा ऑनलाईन (Online Education) पद्धतीनेच सुरू आहे. असे असताना परीक्षा मात्र ऑफलाईन (Offline Exam) पद्धतीने घेण्यात येणार असल्याने कोल्हापुरातील विद्यार्थी आक्रमक (Students Protest in Kolhapur) झाले आहेत. शिवाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात किंवा रद्द कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. अनेक शाळांमधील अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे का याचीसुद्धा शिक्षण विभागाने तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कोल्हापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाबाहेर शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केले.

प्रतिक्रिया देताना विद्यार्थी
  • ...तर आत्महत्या झाल्यास शासन जबाबदारी घेणार का? :

विद्यार्थ्यांनी म्हंटले की, ऑक्टोंबर 2021 पासून दहावी आणि बारावीचे ऑफलाईन शिक्षण प्रक्रिया सुरु झाली. त्या प्रक्रियेमध्ये वार्षिक अभ्यासक्रमांपैकी केवळ 10 टक्के अभ्यासक्रम ऑफलाईन शिकवण्यात आला. अशा परिस्थितीत फक्त 10 टक्के ऑफलाईन अभ्यासक्रमाच्या आधारे आपण ऑफलाईन परीक्षा घेणार आहात का? जर 65 टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन झाला असताना ऑफलाईन परीक्षेचा अट्टाहास कशासाठी? असाही सवाल त्यांनी केला आहे. कोरोनाचासुद्धा धोका आहे, त्यामुळे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने व्हावी किंवा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. शिवाय जर अभ्यासक्रम पूर्ण न होता परीक्षा होत असतील आणि त्यामध्ये मुलांना फटका बसला तर आत्महत्या झाल्यास त्याची शासन जबाबदारी घेणार का? असा सवालसुद्धा या विद्यार्थ्यांनी केला.

  • शाळा, महाविद्यालयात जाऊन अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केला का, याचीही खातरजमा करा :

कोल्हापूर विभागातील सर्वच शैक्षणिक संस्थांनी परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केला आहे काय याचीही खातरजमा होणे गरजेचे आहे, असे यावेळी विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे. ऑफलाईन अभ्यासक्रम झाला नसल्याने आपण आमच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेऊन पुरेसा वेळ देऊन ऑनलाईन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, तसेच आमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी सहकार्य करावे, असेही विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे.

Last Updated : Jan 31, 2022, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.