ETV Bharat / city

Kolhapur ST Employees Agitation ; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा

राज्यभरातील एसटी सेवा अजूनही मोठ्या प्रमाणात ( Strike on ST services ) ठप्प आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी ( ST Employees suicide ) आत्महत्या केल्या आहेत. मात्र, सरकारला आमच्या मागण्यांचे काहीही देणेघेणे नाही, असा एसटी कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

एसटी कर्मचारी आंदोलन
एसटी कर्मचारी आंदोलन
author img

By

Published : Feb 14, 2022, 2:58 PM IST

Updated : Feb 14, 2022, 3:13 PM IST

कोल्हापूर - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून संप ( ST employees agitation in Kolhapur ) पुकारला आहे. आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी, श्रमिक संघटना आणि कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्वच एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

राज्यभरातील एसटी सेवा अजूनही मोठ्या प्रमाणात ( Strike on ST services ) ठप्प आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी ( ST Employees suicide ) आत्महत्या केल्या आहेत. मात्र, सरकारला आमच्या मागण्यांचे काहीही देणेघेणे नाही, असा एसटी कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

अन्यथा कर्मचाऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागेल
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या विराट मोर्चाच्या वेळी कर्मचारी म्हणाले, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचासुद्धा मुद्दा आहे. आम्हाला राज्य सरकारने केलेली वेतनवाढ ( ST employees on Salary hike ) मान्य नाही. त्यामध्ये वाढ व्हावी, या मागणीसाठीही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या मागणीसाठी अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारकडून काहीही दखल घेतली नसल्याने संपाचे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा-Goa Election Live Updates : दुपारी एक वाजतापर्यंत 44.62 टक्के मतदान; 40 जागांसाठी चुरशीची लढत

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन

सरकार अजूनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. उलट राज्य सरकार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी म्हटले. येणाऱ्या पुढच्या काळात कर्मचाऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले, असा इशाराही एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा-Telangana CM : 'सरकारने सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावे', तेलंगणा सीएम KCR यांचा राहुल गांधींना पाठिंबा

एसटी महामंडळाला कोट्यवधींचा फटका
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत. एसटीची सर्व वाहतूक अद्याप ठप्प आहे. काही मोजक्या एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे एसटी महामंडळाचे एकट्या कोल्हापूर विभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. आजच्या या संपाला कोल्हापुरातील भाजपनेही पाठिंबा दिला आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा-Polling Percentage In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये 1 वाजेपर्यंत ३५.२१% मतदान झाले

Last Updated : Feb 14, 2022, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.