कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरातील एसटी वाहतूक ठप्प आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा आंदलकांनी दिला आहे. त्यानुसार सकाळपासून शेकडो कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून जागरण गोंधळ आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा - खाजगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना फटका
कोल्हापूर विभागात एसटी कर्मचाऱ्यांचा 100 टक्के कडकडीत बंद
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक ठप्प आहे. आज तिसऱ्या दिवशीसुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे, आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे. जिल्ह्यात एकूण 12 एसटी डेपो आहेत. हे सर्वच डेपो बंद आहेत, त्यामुळे आत्तापर्यंत तब्बल दीड कोटींहून अधिकचे नुकसान एसटी महामंडळाला झाले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, आता शासन हा तिढा कशा पद्धतीने सोडविणार हे पाहावे लागणार आहे.
आजच्या कॅबिनेट बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा
शासन आजपर्यंत वेळकाढूपणा करत आले आहे. त्यामुळे, आता हे चालणार नाही. राज्य सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही कर्मचाऱ्यांनी म्हटले असून, असे न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांमुळे नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ आणि नागरिकांना महापुराचा फटका : मेधा पाटकर