ETV Bharat / city

कोल्हापूरकर खात असलेले मटण किती सुरक्षित? 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट

author img

By

Published : Dec 7, 2020, 1:55 PM IST

Updated : Dec 8, 2020, 11:14 AM IST

कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर तांबडा-पांढरा येणार नाही, असं क्वचितच घडत असेल. दररोज कोल्हापूरकर हजारो किलो मटण आणि चिकनवर ताव मारत असतात. मात्र आपण खात असलेलं हे मांस किती निरोगी आणि सुरक्षित आहे, याचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे.

mutton shops in kolhapur
दैनंदिन आहारातील मांस किती निरोगी? 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट

कोल्हापूर - कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर तांबडा-पांढरा येणार नाही, असं क्वचितच घडत असेल. दररोज कोल्हापूरकर हजारो किलो मटण आणि चिकनवर ताव मारत असतात. मात्र आपण खात असलेलं हे मांस किती निरोगी किंवा सुरक्षित आहे, याची चिंता कोणी करत नाही. एकदा जेवणाचं ताट वाढलं, की याची माहिती करून घेण्याची गरजही आपल्याला भासत नाही. मात्र दैनंदिन आहारातील मांस नक्की कोणत्या प्रतीचे असते? ते कशा प्रकारे कापले जाते? कापण्याचा जागेबाबत स्वच्छता पाळण्यात येते का? 'ईटीव्ही भारत'ने याचा ग्राऊंड रिपोर्ट घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर...

दैनंदिन आहारातील मटण किती निरोगी? 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट

मांस खाण्यास निरोगी आहे का, म्हणजे नेमकं काय?

शहरातील प्रत्येक मांस विक्री करणाऱ्या दुकानात महापालिकेच्या कत्तल खान्यातून तपासणी करून आलेले मटण विक्रीसाठी ठेवणे बंधनकारक आहे. म्हणजे मांस खाण्यास योग्य आहे का? त्याला कोणता आजार वगैरे आहे की नाही, याबाबत पालिकेच्या आरोग्य निरीक्षकासह पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होणे बंधनकारक आहे. हा कत्तलखाना शिरोली जकात नाका परिसरात आहे.

बकऱ्यांची तपासणी नाहीच

एकीकडे तपासणी झालेल्या बकऱ्यांचे मांस विक्री करणे बंधनकारक असताना दुसरीकडे दिवसभरात केवळ 20-25 बकऱ्यांची महापालिकेच्या कत्तलखान्यात कत्तल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपण खात असलेले मांस निरोगी आहे की नाही, याची तपासणी न होताच गे ग्रहण केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याकडे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. याबाबत पूर्वी देखील आंदोलने झाली आहेत. मात्र अद्याप कोणताही बदल झाला नाही.

शहरात 216 दुकानं; दररोज शेकडो बकऱ्यांची कत्तल

कोल्हापूर शहरात जवळपास 216 मटणाची दुकानं आहेत. त्यातील सद्यस्थितीत 157 दुकान सुरू आहेत. याठिकाणी शेकडो बकऱ्यांची कत्तल होत असते. तर मोजक्याच दुकानांत महापालिकेच्या कत्तल खान्यातून तपासलेले मटण विक्रीस येते. यातील अनेक दुकानांत स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून घालून दिलेले अनेक नियम पाळलेले दिसून येत नाहीत.

पालिकेने कत्तलखाणे वाढवून सर्व सोयी उपलब्ध करून घ्याव्यात

शहरात एकूण मांस विक्रीच्या दुकानांची संख्या जवळपास 216 आहे. यातील अनेक दुकाने गल्ली बोळामध्ये आहेत. यामध्ये तपासणी केलेलं मांस विक्रीसाठी ठेवण्याचा नियम आहे. आम्हाला कत्तल खान्यातून तपासणी केलेले मांस विक्री करण्यासाठी काहीही अडचण नाहीये. मात्र महापालिकेकडे केवळ एकच कत्तलखाना आहे. शिवाय तो सुद्धा मध्यवस्तीपासून जास्त अंतरावर आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे केवळ 2 वाहने आहेत. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी आणखी काही कत्तलखाने उपलब्ध करून देण्याची मागणी मटण विक्रेत्यांनी केली आहे.तसेच आवश्यक सोयी पुरवल्यास आम्हाला तपासणी केलेले मांस घ्यायला काहीही अडचण नसल्याचे खाटीक संघटनेचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी सांगितले.

पालिकेकडे कारवाईचे अधिकार नाही त्यामुळे अडचण

कत्तलखान्यात बकऱ्यांची तपासणी करून देणे, इतकेच अधिकार आमच्याकडे आहेत. दुकानांमध्ये मांस तपासणी केलेले आहे की नाही याची तपासणी करण्याचे तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पालिकेकडे नाहीत. त्यामुळे ही अडचण असल्याचे पालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.

अन्न औषध प्रशासनाकडून बोटावर मोजण्याइतपत कारवाई

एकीकडे महापालिकेचे अधिकार अन्न आणि औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहेत. महापालिकेचे अधिकारी आपल्याकडे कारवाईचे अधिकार नसल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे अन्न औषध प्रशासनाकडून देखील अत्यंत किरकोळ कारवाई झाल्याचे समोर आले. मागील 2 ते 3 वर्षांत केवळ 48 कारवाया कोल्हापुरात करण्यात आल्या. त्यातील काही कारवाई तर कोल्हापुरात मटण दरावरून झालेल्या आंदोलनानंतर झाल्या आहेत. त्यामधून जवळपास 1 लाख 60 हजारांचा दंड वसून करण्यात आला आहे. काही दुकानांनी दंड भरला नसल्याने त्यांचे दुकान बंद करण्याची सुद्धा कारवाई करण्यात आले. याबाबत अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर अधिक माहिती दिली.
काय आहेत स्वच्छतेचे नियम?

1) परवाना घेणे बंधनकारक
2) बकरे मेहंदी करण्यापूर्वी व कापल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होणे व तसा शिक्का असणे बंधनकारक
3) दुकानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असली पाहिजे
4) दुकानातील अवजारे गंज विरहीत धातूपासून बनवलेली पाहिजेत
5) धार्मिक स्थळांपासून दुकानं 50 मीटर अंतरावर असावीत.
6) पाच फुटांपर्यंत ग्लेज टाइल्स लावलेले असाव्यात
7) दुकानात फॅनची सोय असावी
8) कामगारांची वैद्यकीय चाचणी केलेली असावी
9) जिवंत बकरे दुकानात ठेवण्यास मनाई
10) दुकानातील जमिनीवर पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी
11) कचऱ्याची योग्य व्यवस्था करून वेळोवेळी स्थानिक प्रशासनाने केलेल्या सूचनेनुसार डीस्पोज केला पाहिजे.

यांसह अनेक नियम अन्न आणि औषध प्रशासनाने घालून दिले आहेत. अनेक दुकानांमध्ये हे नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे.

आम्हाला निरोगी मटण खायला घातले जाते

शासनाच्या नियमानुसार प्रत्येक मासंविक्रीच्या दुकानात महापालिकेने तपासणी केलेले मटन विक्री करणे बंधनकारक आहे. शिवाय या दुकानांना अनेक निर्बंध घालून दिले आहेत. असे असताना हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. आम्ही निरोगी मांस खातो हे आम्हाला कसे समजणार? असा सवाल सुद्धा 'कॉमन मॅन' संघटनेचे बाबा इंदुलकर यांनी उपस्थित केला असून संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा याची वेळोवेळी तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोल्हापुरात पुन्हा मटण लढा सुरू होईल - कॉमन मॅन संघटना

मागील वर्षी मटण दराबाबत कोल्हापूरकरांनी आंदोलन केले. चांगले मटण मिळावे, शिवाय योग्य दरात मिळावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती आहे. अधिकारी सुद्धा नियम पाळत नसलेल्या दुकानदारांवर कारवाई करत नाहीत. 31 डिसेंबरला सुद्धा कोल्हापुरात शेकडो बकऱ्यांची कत्तल होते आणि आम्हाला घाणेरडे मटण खायला घातले जाते. त्यामुळे आता कोल्हापूरकर पुन्हा जागे होतील आणि पुन्हा हा लढा सुरू होईल, असा इशारा कॉमन मॅन संघटनेच्या बाबा इंदुलकर यांनी दिला आहे.

Last Updated : Dec 8, 2020, 11:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.