कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर झालेल्या शाईफेकीच्या (Deepak Dalvi Ink Thrown) निषेधार्थ कोल्हापुरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून, शिवसैनिकांकडून कन्नड संघटनेचा काळा -पिवळा झेंडा जाळण्यात (Kolhapur Shivsena Protest) आला. गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद (Karnataka Maharashtra Bounderism) सुरू आहे. अशातच काल कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकली. याचे पडसाद बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. आज येथील ऐतिहासिक बिंदू चौकात कन्नड रक्षक वेदिक संघटनेचा लाल पिवळा ध्वज (Kannad Rakshak Vedik Flag Burned) जाळण्यात आला.
शाई फेकून गेले पळून
महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी हे एका कार्यक्रमासाठी जात असतांना करवे या ठिकाणी कन्नड रक्षक वेदिक समितीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा करायची आहे, असे सांगून त्यांना बाजूला नेले. त्यांच्यावर शाई फेकून ते पळून गेले. तर या घटनेनंतर याचे तीव्र पडसाद बेळगाव सह महाराष्ट्रात उठत आहेत.आज कोल्हापुरातील बिंदू चौकात शिवसेनेच्या वतीने कन्नड संघटनेचा निषेध व्यक्त करत कन्नड रक्षक वेदिक संघटनेचा लाल पिवळा झेंडा जाळला.
हा भ्याड हल्ला पूर्व नियोजित
यावेळी बोलताना शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar Shivsena) म्हणाले, हा भ्याड हल्ला पूर्व नियोजित आणि शासन पुरस्कृत होता. बेळगावात मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा सतत प्रयत्न होत आहे. परंतु मराठी माणूस गप्प बसणार नाही. जेवढ त्रास द्याल, तेवढ्याच ताकतीने सीमाभागात मराठी माणूस पुन्हा उतरेल. सीमाभागातील मराठी माणसाबरोबर शिवसेना सैदव उभी असेल. कोल्हापुरात राहणाऱ्या कन्नड व्यावसायिकांचा देखील चांगलच बंदोबस्त करू शकतो परंतु, माणुसकीच्या भावनेने आम्ही गप्प आहोत. जर कन्नड सरकारने या गुंडाचा बंदोबस्त केला नाही तर, महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड व्यावसायिकांचा शिवसेना स्टाईलने बंदोबस्त करू, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनास जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मनजीत माने, सुजित चव्हाण, पृथ्वीराज पाटील, स्मिता सावंत, अवधूत साळुंके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.