ETV Bharat / city

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मान्य असेल - माजी आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये (North Kolhapur Bypoll) जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांना बिनविरोध करण्यास आपला विरोध नाही. मात्र, मातोश्रीवरून पक्षप्रमुखांचा जो आदेश येईल त्यानुसार आमची पुढची भूमिका असेल, असे वक्तव्य माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी केले आहे.

Rajesh Kshirsagar
माजी आमदार राजेश क्षीरसागर
author img

By

Published : Dec 8, 2021, 8:59 PM IST

कोल्हापूर - राजकारणापेक्षा माणुसकी महत्वाची आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये (North Kolhapur Bypoll) जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांना बिनविरोध करण्यास आपला विरोध नाही. पोटनिवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून पक्षप्रमुखांचा जो आदेश येईल त्यानुसार आमची पुढची भूमिका असेल, असे वक्तव्य राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी केले आहे.

माजी आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर उत्तरचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant Jadhav Death) यांच्या निधनानंतर आता या जागेसाठी पोटनिवडणूक लागणार आहे. मात्र, या जागेसाठी आता राजकारण सुरू होताना जाणवत आहे. जाधवांच्या शोकसभेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी तिकीट जयश्री जाधव यांना देऊन त्यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन केले होते. दुसऱ्या बाजूला माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना याबाबत विचारले असता क्षीरसागर म्हणाले, माणुसकीपेक्षा राजकारण मोठं नाही. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाची घटना दुदॆवी आहे. माझ्यावतीने व शिवसेनेच्यावतीने त्यांना आदरांजली वाहिली आहे. आमदार म्हणून त्यांना पाच वर्षे पूर्णवेळ मिळायला पाहिजे होता. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक बिनविरोध करण्यासंबंधी आवाहन केले आहे. जाधव यांच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक लढवायची की बिनविरोध करायची यासंबंधीचा निर्णय पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. पक्षप्रमुख ठाकरे हे मोठ्या मनाचे आहेत. ते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. जर निवडणूक लागली तर आपली लढायची तयारी आहे. सध्या सर्वच निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जात असतील तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा देखील योग्य सन्मान राखला पाहिजे. महविकास आघाडी म्हणून शिवसेनेवर कायम अन्याय होत आहे, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता असल्याचे माजी आमदार क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले आहे. गोकुळची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जात असेल तर महापालिकेची निवडणूक का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे.

  • २०१९ ला थोड्या मतांनी झाला होता पराभव -

गेली 10 वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा 2019 मध्ये अगदीं थोड्या मतांनी पराभव झाला होता. तब्बल 76 हजार मते राजेश क्षीरसागर यांच्या पारड्यात पडली होती. त्यामुळे जनतेचा कौल हा आपल्याच बाजूने आहे. मी आमदार असताना शहराच्या विकासासाठी अनेक कामे केली आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत संधी मिळाल्यास निश्चितच शहराच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले आहे.

  • हरलो तेव्हापासूनच पुन्हा कामाला लागलो

निवडणूक हरलो परंतु थांबलो नाही. लगेच दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. निवडणूक म्हणजे क्रिकेटच्या मॅचसारखी आहे. हरलो म्हणून थांबून चालत नाही. पुन्हा खेळावच लागतं. माझा पराभव झाला. गेल्या 10 वर्षात असा कोणताही प्रश्न मी सोडला नाही ज्यामुळे जनतेला त्रास होतो. आंदोलनात्मक असेल किंवा कोरोना काळातील मदत असुदे, मी निवडणूक हरलो तरी राज्य नियोजनचं पद आहेच आणि त्या मार्फत काम करतच असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. मी लढायला तयार आहे. माझी लढायची तयारी पहिल्यापासूनच सुरू आहे. त्यामुळे निवडणूक लढल्यावर जनताच ठरवेल. मी करत असलेल्या कामामुळे बाकी सर्वजण मागे जातील या भीतीने सर्वांनी एकत्र येत पराभव केला. जनतेने मला मतदान कमी केले नाही.गेल्या ५ वर्षात मित्र पक्षातील प्रमुखांचं किती पटलं सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी माझ्यावर किती आरोप केले. परंतु माझं एकच चुकलं मी त्या अरोपांचं खंडन केले नाही. मात्र आता जनतेने पाहिलं आहे कोण किती काम करतं ते. त्यामुळे जनता आणि पक्षप्रमुख ठरवतील, असे देखील राजेश क्षीरसागर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.