ETV Bharat / city

शासनाचा आदेश पालन न करणारे गोकुळ पाकिस्तानात आहे का?, कोल्हापूरमध्ये शिवसेना आक्रमक

कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, सदर नियुक्तीनंतर दीड महिन्याचा कालावधीत झालेल्या कोणत्याही संचालक मंडळ बैठकीत सदर आदेश विषयपत्रिकेवर घेतला नाही. त्याचबरोबर यासंबंधी शासनास पाठवायचे इतिवृत्तही सादर केलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज गोकुळ शिरगांव येथील कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला.

गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा

author img

By

Published : Aug 27, 2021, 8:28 PM IST

कोल्हापूर - शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, सदर नियुक्तीनंतर दीड महिन्याचा कालावधीत झालेल्या कोणत्याही संचालक मंडळ बैठकीत सदर आदेश विषयपत्रिकेवर घेतला नाही. त्याचबरोबर यासंबंधी शासनास पाठवायचे इतिवृत्तही सादर केलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज गोकुळ शिरगांव येथील कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला. यावेळी गोकुळ प्रशासनास चांगलेच धारेवर धरले.

'शासनाचा आदेश पालन न करणारे गोकुळ पाकिस्तानात आहे का?'

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा आदेश असतानाही आपण सदर आदेशाची अंमलबजावणी अजूनही का केली नाही? आपल्यावर यासंबंधी कोणाचा दबाव आहे का? हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची गोकुळमध्ये अडचण होते आहे का? शासनाचा आदेश पालन न करणारे गोकुळ पाकिस्तानात आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून शिवसैनिकांनी गोकुळ कार्यालय परिसर दणाणून सोडला.

'शिवसेना स्टाईलने उत्तर देवू'

पद आणि सत्ता यापेक्षा आम्हाला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य आहे. ठाकरे परिवार आमचे दैवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचा अवमान आम्ही शिवसैनिक कधीही खपवून घेणार नाही. दिलेल्या पत्राप्रमाणे आपण सदर आदेश संचालक मंडळ बैठकीत ठेवून आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर हजारो शिवसैनिकांसह गोकुळमध्ये घुसून शिवसेना स्टाईलने उत्तर देवू, असा सज्जड इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला. दरम्यान, ऑगस्ट महिना अखेरीस होणाऱ्या गोकुळच्या संचालक मंडळ बैठकीत जाधव यांच्या नियुक्तीचा विषय निर्णयार्थ अजेंड्यावर घेण्याचे कार्यकारी संचालक घाणेकर यांचे लेखी पत्र आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.