ETV Bharat / city

राजर्षी शाहू महाराजांची जयंती राधानगरी धरणावर साजरी करणार - समरजीतसिंह घाटगे - शाहू महाराजांची जयंती उद्या राधानगरी धरणावर साजरी होणार

राधानगरी धरण येथे राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर समरजितसिंह घाटगे यांनी प्रत्यक्ष धरणावर जाऊन तयारीची पाहणी केली. यानंतर ते म्हणाले, राधानगरी धरण हे शाहूंच्या कार्याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळेच हा शाहू जयंती सोहळा आम्ही इथे करण्याचा निर्णय घेतला.

राम
शाहू महाराज जयंती
author img

By

Published : Jun 25, 2021, 9:22 PM IST

Updated : Jun 26, 2021, 7:46 AM IST

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज (26 जून) संपूर्ण देशभरात साजरी होते. मात्र यावर्षीपासून शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहूंची जयंती राधानगरी धरणावर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. बारा बलुतेदार यांच्या हस्ते या ठिकाणी राधानगरी धरणातील पाण्याचे पूजन आणि त्याच पाण्याने शाहूंच्या मूर्तीला जलाभिषेक सुद्धा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्वतः समरजितसिंह घाटगे यांनी राधानगरी धरण येथे प्रत्यक्ष जाऊन तयारीची पाहणी केली. दरम्यान, राजर्षी शाहू महाराजांच्या कृतीचे जीवंत स्मारक म्हणून राधानगरी धरणाकडे पाहिले जाते आणि त्याच ठिकाणी यावर्षीपासून त्यांची जयंती साजरी केली जाणार असल्याने सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

राम
राम
'धरणावर शाहू जयंती दरवर्षी होणार'

राधानगरी धरण येथे आज(शनिवारी) राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर समरजितसिंह घाटगे यांनी प्रत्यक्ष धरणावर जाऊन तयारीची पाहणी केली. यानंतर ते म्हणाले, राधानगरी धरण हे शाहूंच्या कार्याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळेच हा शाहू जयंती सोहळा आम्ही इथे करण्याचा निर्णय घेतला. इथून पुढे दरवर्षी ही शाहू जयंती एखाद्या सोहळ्याप्रमाणे दिमाखात साजरा केली जाईल. यावर्षी अगदी मोजक्या लोकांच्या संख्येत जयंती सोहळा पार पडणार असला तरी तो अगदी तितक्याच उत्साहाने आणि उत्तमरित्या पार पडायला हवा, यात कोणतीही कमी राहता कामा नये, यासाठी शनिवारी स्वतः लक्ष घालून याची सर्व पाहणी केली आणि संबंधितांना आवश्यक त्या सर्व सूचना देऊन अगदी चोख तयारी करण्यासाठी सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

समरजितसिंह घाटगे

हेही वाचा -संजय राऊत अडचणीत, आरोप करणाऱ्या तरुणीची अजून एक याचिका दाखल

Last Updated : Jun 26, 2021, 7:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.