कोल्हापूर - विधानसभेला आम्ही कोल्हापूर जिल्हा भाजप मुक्त केला. आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाजपला हद्दपार केले असल्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे. खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता खेचून आणण्यात यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
मंत्री पाटील यांनी काही कारणास्तव या निवडीवेळी उपस्थित राहू शकलो नसल्याचे सांगत, निवडून आलेल्या महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष बजरंग पाटील आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांचे अभिनंदन केले.