ETV Bharat / city

Dhananjay Mahadik : संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक आता एकत्र येणार? पाहा काय म्हणाले धनंजय महाडिक - कोल्हापूर

राज्यातील सत्तांतर होत असताना संजय मंडलिक ( Sanjay Mandalik ) यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्याशी चर्चा केली होती. शिवाय देवेंद्र फडणवीस आणि माझ्याशी सुद्धा चर्चा केली होती. मात्र त्यांनी काय चर्चा केली हे विचारू नका असेही महाडिक म्हणाले.

Dhananjay Mahadik
धनंजय महाडिक
author img

By

Published : Jul 30, 2022, 4:03 PM IST

कोल्हापूर : संजय मंडलिक आता शिंदे गटात आले आहेत, त्यामुळे आगामी काळात कोल्हापुरात त्यांच्याशी अनेक ठिकाणी आघाडी होऊ शकेल. शिवाय तशी चर्चा झाली तर निश्चितच आम्ही त्यामध्ये इच्छुक आहोत असे वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले. ते कोल्हापुरात माध्यमांसोबत बोलत होते. शिवाय मंडलिक यांनी शिंदे गटात येण्यापूर्वी माझ्याशी सुद्धा चर्चा केली होती. मात्र त्यांनी काय चर्चा केली हे मात्र आपण सांगणार नसल्याचे महाडिक यांनी म्हटले. त्यांच्या या विधानानंतर कोल्हापुरातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

शिंदे, फडणवीस अन् माझ्याशी सुद्धा चर्चा : यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, राज्यातील सत्तांतर होत असताना मंडलिक यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. शिवाय देवेंद्र फडणवीस आणि माझ्याशी सुद्धा चर्चा केली होती. मात्र त्यांनी काय चर्चा केली हे विचारू नका असेही महाडिक म्हणाले.

धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

येणाऱ्या निवडणुकांमध्ये ताकदीने उतरणार - सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते की आम्ही रणांगणात उत्तर देऊ त्यालाच उत्तर देताना महाडिक म्हणाले, त्यांना आम्ही अनेक निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने आम्ही रणांगणातून बाहेर गेलो आहेत असा समज होता. मात्र, आता आम्ही रणांगणातच आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ताकदीने उतरणार असेही महाडीकांनी स्पष्ट केले. शिवाय येणाऱ्या काळात अनेक प्रलंबित प्रश्न आपण सोडवणार आहे, असेही सांगितले.

हेही वाचा - Governor Bhagat Singh Koshyari : राजकीय वातावरण तापल्यावर अखेर काय म्हणाले राज्यपाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.