ETV Bharat / city

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक- मुश्रीफ

महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावाले कोमात आहेत की काय? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री
हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री
author img

By

Published : May 28, 2021, 9:52 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावाले कोमात आहेत की काय? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. गेली अठरा महिने आमचे सरकार सुस्थितीत चालले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाळा देत दीड वर्षांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचाही आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक- मुश्रीफ

'आमचे सरकार पाच वर्षे चांगले चालणार'
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारबद्दल नाराजी व आंदोलन केल्याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षणाबाबत राज्यांना अधिकार नाहीत. तसेच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही व गायकवाड समितीचा अहवालही विश्वासार्ह नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला. चंद्रकांत पाटील हे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बोनसमध्ये चालले असल्याची टीका करीत आहेत. याबद्दल विचारले असता मुश्रीफ म्हणाले, गेले अठरा महिने राज्यसरकार चांगले चाललेले आहे. सरकार तर पाच वर्षे चालणार आहेच आणि त्याचा बोनस त्यानंतर त्यापुढच्या पाच वर्षात मिळणार आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेली "सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन" ही संघटना भाजपा आणि आरएसएसशी संबंधित असल्याचा आरोप करतानाच मुश्रीफ म्हणाले, या संघटनेचे पदाधिकारी भाजपा आणि आरएसएसचेही पदाधिकारी आहेत.

संभाजीराजेच्या भूमिकेचे मुश्रीफ यांच्याकडून स्वागत
मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले, संभाजीराजे छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत भेटले आहेत. मराठा आरक्षणाबाबत तुझे-माझे करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन लढूया ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यांनी अनेक विधीतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे सांगतानाच मंत्री मुश्रीफ म्हणाले, आरक्षणाचे हे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे, केंद्राकडे जावे लागेल. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाबाबत प्रयत्न केले पाहिजेत असेही त्यांनी म्हटले.

कुटील राजनीती
एकाबाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असा प्रयत्न करायचा तर दुसऱ्या बाजूला टिकणार नाही असे आरक्षण द्यायचे. तसेच मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवून आंदोलनासाठी उचकवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा तिहेरी डाव असल्याचे सांगत काहीही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - पुण्यातील विकेंड लॉकडाऊन रद्द; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.