ETV Bharat / city

कोल्हापुरात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक सुरू - जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथील महाराणी ताराबाई सभागृहात आढावा बैठक सुरू आहे.

आढावा बैठक
आढावा बैठक
author img

By

Published : Jun 14, 2021, 11:13 AM IST

कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथील महाराणी ताराबाई सभागृहात आढावा बैठक सुरू आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर तसेच खासदार, आमदार, जिल्हाधिकारी दौलत देसाई व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत.

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक असल्याने घेताहेत आढावा
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा 4 जून ते 12 जून 2021 यादरम्यान सरासरी पॉझिटिव्हीटी रेट हा जवळपास 10 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या अनेक जिल्ह्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट देऊन तिथल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. शिवाय आरोग्य व्यवस्थेसाठी आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझिटीव्हिटी रेट सर्वाधिक असल्याने ते आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक सुरू झाली आहे.

हेही वाचा - एक वर्ष उलटले! अद्यापही सुशांत सिंहची हत्या की आत्महत्या हे गुढच...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.