ETV Bharat / city

Actor Ramesh Deo Journey : 'या' पक्षाच्या तिकिटावर रमेश देव यांनी लढवली होती लोकसभेची निवडणूक - रमेश देव आणि शिवसेना

रमेश देव यांनी शेकडो मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. दिर्घकाल लक्षात राहतील अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या. विविध अभिनयाने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रमेश देव ( Ramesh Deo ) यांना या काळातच 1996 साली लोकसभा निवडणूक ( 1996 Lok Sabha elections ) लढविण्याबाबत बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी तिकीट दिले. ठाकरे यांचे अतिशय जवळचे असल्याने त्यांनी 1996 ची लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली.

रमेश देव
रमेश देव
author img

By

Published : Feb 2, 2022, 11:39 PM IST

कोल्हापूर - ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे ( Actor Ramesh Deo passed away ) आज (बुधवारी) मुंबई येथे निधन झाले. त्यांचे बालपण कोल्हापुरातच ( Childhood in Kolhapur ) गेले तर अभिनयाची सुरुवात सुद्धा कोल्हापुरात झाली. एवढेच नाही तर त्यांनी कोल्हापूर लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती. त्यामुळे सर्वांनी रमेश देव यांना नेता तसेच अभिनेता या दोन्ही भूमिकेत पाहिले आहे. कसा होता त्यांचा प्रवास आणि कोल्हापुरातील आठवणी यावर प्रकाश टाकणारा ईटीव्ही भारतचा रिपोर्ट...

  • 1996 साली रमेश देव यांनी लढवलेली कोल्हापूर लोकसभा निवडणूक

रमेश देव यांनी शेकडो मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. दिर्घकाल लक्षात राहतील अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या. विविध अभिनयाने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रमेश देव यांना या काळातच 1996 साली लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिले. ठाकरे यांचे अतिशय जवळचे असल्याने त्यांनी 1996 ची लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. त्यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे खासदार उदयसिंह गायकवाड हे होते. रमेश देव यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने येत होते. या सर्व प्रचारादरम्यान इथल्या एका हॉटेलमध्ये त्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा मुक्कान होता. रमेश देव यांना या निवडणुकीत 2 लाखांहून अधिक मते मिळाली, मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला. अभिनयात अनेकांच्या मनावर राज्य केले मात्र राजकारणात त्यांना यश आले नाही.

  • भक्तीसेवा विद्यापीठ शाळेत घेतले प्राथमिक शिक्षण

रमेश देव यांची बालपण, जडणघडण तसेच त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातच झाले. एवढेच नाही तर त्यांच्या अभिनयाची सुरुवात सुद्धा कोल्हापुरात झाली. येथील भक्तीसेवा विद्यापीठ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यांचे आजोबा शाहू महाराजांच्या काळातील वकील तर वडील सुद्धा कोल्हापुरात न्यायाधीश होते. रमेश देव यांनी कोल्हापूरला आपली कर्मभूमीच मानले होते. पुढे त्यांनी एक एक करत शेकडो चित्रपटांमध्ये अभिनय साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आज त्यांच्या जाण्याने अभिनयातील 'देव' गमावला अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

हेही वाचा - Ramesh Deo : अभिनयातील 'देव' हरपला; जाणून घ्या, रमेश देव यांच्याबद्दल....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.