कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ( Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj ) जयंती दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असते. मात्र, यंदा सलग दुसऱ्या वर्षी शाहू महाराजांच्या जिवंत स्मारक असलेल्या राधानगरी धरण येथे मोठ्या उत्साहात शाहू जयंती साजरी झाली. गतवर्षीपासून राजर्षी शाहूंची जयंती राधानगरी धरणावर ( Radhanagari Dam ) साजरी केली जात आहे. शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे ( Samarjit Singh Ghatge ) यांच्या संकल्पनेतूनच ही जयंती साजरी होत आहे.
राधानगरी पाण्याचे जलपूजन आणि जलाभिषेक : यावेळी राधानगरी धरणातील पाण्याचे जलपूजन आणि याच पाण्याने शाहूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. तसेच, अठरापगड जातीच्या लोकांचासुद्धा या शाहू जयंतीनिमित्त आयोजित पूजेमध्ये सहभाग होता. दरम्यान, या वर्षी भर पावसातसुद्धा नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. त्यामुळे पुढच्या वर्षी यापेक्षाही थाटात जयंती साजरी करणार असल्याचे समरजितसिंह घाटगे म्हणाले.
राधानगरी धरण हे राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक : राधानगरी धरण बांधून तब्बल 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न ज्यांनी मार्गी लावला त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यातच नाही, तर देशभरात साजरी होते. मात्र, शाहू महाराज यांना ज्या कागलमधील घाटगे घरण्यातून दत्तक घेतले गेले त्या घाटगे घराण्याचे वारसदार समरजितसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहूंची जयंती राधानगरी धरणावरच साजरी करण्याचे ठरवले होते. गतवर्षीपासून याची सुरुवात झाली.
राधानगरी म्हणेज शाहू महाराजांचे जिवंत स्मारक : राधानगरी धरण म्हणजे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक समजले जाते. शाहू महाराजांनी हे धरण बांधून कोल्हापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटवला. आजही या धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत. जेव्हा धरण 100 टक्के भरतं तेव्हा या धरणाचे दरवाजे आपोआप उघडले जातात, त्यामुळे या धरणाला अधिक महत्त्व प्राप्त होते.
बहुजन समाजाला पहिले आरक्षण देणारे : पाणीप्रश्नाबरोबरच शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी आपलं आयुष्य दिले त्यांचे विविध प्रश्न सोडवले. एवढेच नाही तर सर्वात पहिले बहुजन समाजाला आरक्षणही शाहू महाराजांनी दिले. त्यामुळे शाहू महाराजांचे स्मरण करण्यासाठी त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाहू जनक घराण्याचे वंशज समरजित सिंह घाटगे यांनी इथून पुढे शाहू महाराजांनी जयंती राधानगरी धरणावर साजरी करण्याचा निर्णय गतवर्षी घेतला.
अशी साजरी झाली शाहू जयंती : राजर्षी शाहू महाराजांचा कृतिशील वारसा जगासमोर घेऊन जाण्यासाठी शाहू महाराजांचा जन्मोत्सव गतवर्षीपासून राधानगरी धरणावर साजरा केला जात असून, यापुढे यापेक्षाही मोठ्या प्रमाणात राजरा केला जाणार असल्याचे समरजित घाटगे यांनी म्हटले आहे. दरवर्षी सर्वत्र उत्साहात जयंती साजरी होत असली तरी शाहू महाराजांच्या कृतीचे प्रतीक असलेल्या राधानगरी धरणावर जयंती साजरी करण्यात येत आहे.
धरणासाठी जमिनी देणाऱ्या जमीनधारकांनासुद्धा आमंत्रित : विशेष म्हणजे ज्यांनी या संपूर्ण धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या त्या नागरिकांच्या पूर्वजांनाही या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये अठरापगड जातीच्या लोकांचाही सहभाग होता. या सर्वांच्या हस्ते राधानगरी धरणातील पाण्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर याच धरणातील पाण्याने शाहू महाराजांच्या मूर्तींना विधिवत पद्धतीने जलाभिषेक करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आले होते. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र, यावर्षी मुसळधार पावसातसुद्धा शेकडो लोकांनी या जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती लावली.
हेही वाचा : राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला समरजीतसिंह घाटगेंचे अभिवादन; राधानगरी धरणास भेट