कोल्हापूर कोल्हापूरात काल पासून परतीच्या पावसाने Kolhapur Rain चांगलेच झोडपायला सुरुवात केली आहे. धरणक्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू असून राधानगरी धरणाचे Radhanagari Dam 3 दरवाजे उघडले आहेत. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी सुद्धा आता हळू हळू वाढू लागली आहे, Radhanagari Dam Door Open तर काही बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले आहेत.
5884 क्यूसेक विसर्ग सुरू दरम्यान, कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वयंचलित द्वार क्रमांक 3 उघडले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 5, 6 आणि 3 अशा एकूण तीन दरवाजांमधून 4284 क्यूसेक इतका विसर्ग सुरू आहे, तर पाॅवर हाऊसमधून 1600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एकूण 5884 विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आणखी दरवाजे उघडतील अशी शक्यता आहे.
धरण पूर्ण क्षमतेने भरले राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत 347.40 फूट इतकी झाली आहे. 347.50 फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता असून, नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता प्रवीण पारकर यांनी केले आहे.
गावांना सतर्कतेचा इशारा जोरदार पावसामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज दुपारी 12 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 04 इंच इतकी झाली होती त्यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पंचगंगेवरील 75 बंधारे पाण्याखालील गेले असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळे पाटबंधारे विभागाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.