कोल्हापूर - लग्नासाठी प्रपोज करण्याच्या आजपर्यंत अनेक पद्धती आपण पहिल्या आहेत. अनेक मुली तयार होतात तर अनेक मुली मुलाला नकार देतात. मात्र कोल्हापुरातल्या एका तरुणाने भल्या मोठ्या होर्डिंगद्वारे एका मुलीला लग्नासाठी प्रपोज केले ( hoarding for Propose marriage ) आहे. आणि त्या मुलीने सुद्धा त्याला होकार दिल्याची घटना घडली आहे. एवढेच काय तर मुलीच्या आणि मुलाच्या घरचे सर्वजण सुद्धा तयार झाले आहेत. कोण आहे ही रोमँटिक जोडी आणि कधीपासून आहेत एकत्र पाहुयात या विशेष रिपोर्ट मधून...
2017 पासून एकाच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण - कोल्हापुरातल्या येथील सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील मुलगी उत्कर्षा दोघेही बुधगाव-सांगली येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. मात्र जेंव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेंव्हा सौरभच्या घरच्यांनी कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर मागणी घालू असे म्हंटल्यानंतर त्याने तात्काळ आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी रीतसर तिच्या घरी लग्नासाठी मागणी घालायचे ठरवले. त्यानुसार सौरभ च्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी मागणी घातली. उत्कर्षाच्या घरच्यांचे सुद्धा काही दिवस होय नाही होय नाही हेच सुरू होते. उत्कर्षाकडून सुद्धा अध्याप होकार आला नव्हता. अनेक प्रयत्नानंतर शेवटी घरचे सुद्धा तयार झाले. मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने तिला प्रपोज करायचे असे सौरभने ठरवले होते. त्यानुसार त्याने कोल्हापूर सांगली रोड वर एका होर्डिंगद्वारे प्रोपोस करायचे ( hoardings on Sangli Kolhapur highway ) ठरवले. येथील रस्त्याच्या बाजूला असलेले 50*25 आकाराच्या होर्डिंग वर 'उत्कर्षा मॅरी मी - सौरभ' एव्हढेच लिहून त्याने अनोख्या पद्धतीने प्रपोज केले. या अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली आणि या होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या लव्ह स्टोरीची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे.
27 मे रोजी लग्न - दरम्यान, दोघांच्याही घरचे तयार झाले आहेत. शिवाय येत्या 27 मे रोजी दोघांचे लग्न सुद्धा ठरवले आहे. त्यामुळे आम्ही दोघेही आनंदी असून आगळ्या वेगळ्या प्रकारे प्रपोज करून लग्न होत असल्याचा शिवाय कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात याची चर्चा सुरू असल्याचाही आनंद होत असल्याचे दोघांनी म्हटले आहे. दरम्यान, दोघेही आता एमटेक सुद्धा करत आहेत.
हेही वाचा - पाकिस्तानी नागरिकाने भारतातील राम जानकी मंदिराची केली विक्री, खरेदीदाराने मंदिराच्या जागेवर बांधले हॉटेल