ETV Bharat / city

Jayprabha Studio Kolhapur : जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी दंडवत घालून अंबाबाईला घातले साकडे

कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक असा जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन सुरु ( Save Jayprabha Studio Kolhapur Protest ) आहे. आंदोलकांनी आज कॅमेरा स्तंभ ते अंबाबाई मंदिरापर्यंत ( Ambabai Mandir Kolhapur ) दंडवत घालत अंबाबाईला स्टुडिओचा प्रश्न सुटण्यासाठी साकडे घातले.

जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी दंडवत घालून अंबाबाईला घातले साकडे

author img

By

Published : Mar 8, 2022, 7:20 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरचा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने ( Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahasangha ) गेल्या २४ दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या दारात बेमुदत साखळी उपोषण सुरू ( Save Jayprabha Studio Kolhapur Protest ) आहे. याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापुरातील कॅमेरा स्तंभ ते अंबाबाई मंदिरापर्यंत ( Ambabai Mandir Kolhapur ) दंडवत घालत श्री अंबाबाईला जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न लवकर सुटावा यासाठी साकडे घालण्यात आले आहे. तसेच लवकरात लवकर जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी पुन्हा सुरू करावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. जयप्रभा स्टुडिओची २ वर्षापूर्वीच विक्री झाल्याने कोल्हापूरकर आणि कलाकार आक्रमक झाले आहेत. दरम्यान चित्रपट महामंडळाने जोपर्यंत स्टुडिओ पुन्हा मिळत नाही आणि चित्रीकरण पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी दंडवत घालून अंबाबाईला घातले साकडे

मुख्य रस्त्यावरून दंडवत आंदोलन

कोल्हापूरचा हा वारसा जपणारा आणि हजारो चित्रपटांना साक्ष असणारा जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी गेले २४ दिवस साखळी उपोषण करण्यात येत आहे. मात्र या उपोषणाची दखल अद्याप कोणी घेतली नसल्याने आता चित्रपट महामंडळ आक्रमक झाले असून, रोज नवनवीन पद्धतीने आंदोलन करत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे. आज २४ व्या दिवशी जयप्रभा बचाव म्हणत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने सभासदांनी कोल्हापुरातील कॅमेरा स्तंभ, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे , महाद्वार रोड वरून अंबाबाई मंदिरात असे दंडवत घालत आंदोलन केले. तसेच श्री अंबाबाईला जयप्रभा स्टुडिओ प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावा आणि चित्रीकरणासाठी पुन्हा सुरू व्हावे असे साकडे घालण्यात आले.

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची तब्बल 6 कोटी 50 लाखांना विक्री झाली आहे. कोल्हापुरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड झाले होते. जी जागा हेरिटेज वास्तूमध्ये होती. त्याचीच विक्री झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

या आहेत मागण्या

1.जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ खुला झाला पाहिजे

2.जयप्रभा स्टुडिओमधील इमारतीसह खुली जागा आरक्षित रहावी व चित्रीकरण व्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये

3.कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यावसायिकीकरण / वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये

4. जयप्रभा स्टुडिओचे जतन होण्याकरिता शासनाने व कोल्हापूर महानगरपालिकेने लक्ष घालावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.