कोल्हापूर - खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कळंबा कारागृहातून पलायन केले आहे. कारागृहातील गेटचे काम करत असताना कैद्याने कारागृहातून पळ काढला. कैदी पळून गेल्याचे समजतात जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली असून कारागृह प्रशासनासह पोलिसांची तारांबळ उडाली आहे.
गेल्या दीड महिन्यातील कैदी पळून जाण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे कारागृह प्रशासन नेमके काय करते? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पळून गेलेल्या कैद्याने जवळपास आठ वर्षे आपली शिक्षा भोगली आहे. विठ्ठल अलगुडे असे या कैद्याचे नाव आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या अलगुडेवाडीमधील तो रहिवासी आहे. दुपारी दीडच्या दरम्यान ही घटना घडली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. या घटनेनंतर जिल्ह्यात कडक नाकाबंदी केली असून या कैद्याचा शोध घ्यायचे काम सुरू आहे.