कोल्हापूर - राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शिवाजी महाराजांना ( President ram nath kovind will visit Raigad ) अभिवादन करण्यासाठी रायगडला भेट देणार आहेत. येत्या 7 डिसेंबररोजी राष्ट्रपती रायगडला येणार आहेत, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji raje Chhatrapati ) यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आपण स्वतः याबाबत राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. त्याला प्रतिसाद देत 7 डिसेंबर रोजी ते रायगडला येऊन शिवरायांना अभिवादन करणार आहेत.
हेही वाचा - Kolhapur Election सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना माहिती लपवली - धनंजय महाडीक
ही गौरवास्पद बाब
दरम्यान संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून माहिती देताना म्हटले आहे की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे ( ram nath kovind will visit Raigad ) निमंत्रण दिले होते. याला प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय येत्या 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असेही संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी आता स्वराज्याची राजधानी सजनार
राष्ट्रपती रायगडवर येऊन शिवरायांना अभिवादन करणार आहेत. ही आपल्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींची भेटी घेतली होती. त्यावेळीच त्यांनी रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. त्याला राष्ट्रपतींनी प्रतिसाद दिला असून 7 डिसेंबर रोजी ते रायगड दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान त्यांच्या दौऱ्यासाठी आता स्वराज्याची राजधानी रायगड सजनार असून त्याची तयारी सुद्धा सुरू होईल, अशी माहिती मिळते.
हेही वाचा - ST Workers Strike Issue : अनिल परब यांनी जाहीर केलेला निर्णय मान्य नाही - एसटी कर्मचारी