कोल्हापूर - कोल्हापुरात एसटी आंदोलक(ST Workers Strike) आणि पोलिसांत जोरदार धक्काबुक्की झाली. मध्यवर्ती बस स्थानकातून(Kolhapur Bus Stand) पंचगंगा नदीकडे जलसमाधीसाठी जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेल्याने तणाव निर्माण झाला. पंचगंगा नदीपात्रात जलसमाधी घेण्यासाठी निघालेले 25 एसटी कर्मचारी आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात(Shahupuri Police Station) आणण्यात आले आहे.
- कारवाईच्या धास्तीने महिला आंदोलकाला भोवळ :
आंदोलनाच्या 12 व्या दिवशीही आज एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मध्यवर्ती बसस्थानक आवारात जवळपास दोनशे पेक्षा अधिक आंदोलक या ठिकाणी जमले होते. आंदोलन स्थळावरूनच पंचगंगा घाटाकडे जलसमाधी घेण्यासाठी जाणाऱ्या प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी जबरदस्ती ताब्यात घेतल आहे. या वेळी पोलिसांनी आंदोलकांत जोरदार झटापट झाली आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे अन्यथा संप चिघळले आणि त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली आहे. यावेळी पोलिसांच्या कारवाईच्या धास्तीने महिला आंदोलकाला भोवळ आल्याची घटनाही घडली.
- निलंबित कामगारांनी दिला होता जलसमाधीचा इशारा :
आत्तापर्यंत 40 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तरीही सरकारला जाग येत नाहीये. त्यामुळे कोल्हापूर आगारातील निलंबित कर्मचाऱ्यांनी येथील पंचगंगा नदीमध्ये जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला होता.