कोल्हापूर - सहा ते सात दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील कळंबा तलाव तुडुंब भरून वाहत आहे. याच कंळबा तलावाचे ड्रोनद्वारे केलेले चित्रीकरण खास ईटीव्ही भारतच्या दर्शकांसाठी प्रसारित करण्यात येत आहे. तलावाच्या सांडव्यावरून आता मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आणि पावसात भिजण्यासाठी हौशी कोल्हापूरकर नेहमीच कळंबा तलावावर मोठी गर्दी करत असतात. दोन दिवसांपूर्वी सांडव्यातून दोन तरुण वाहून जाता जाता वाचले. या घटनेनंतर प्रशासनाने याठिकाणी नागरिकांना जाण्यास बंदी घातली आहे. याच कळंबा तलावाचे डोळ्यांना सुखावणारे ड्रोनद्वारे केलेले हे चित्रीकरण.
EXCLUSIVE VIDEO : कळंबा तलाव तुडुंब; तलावाचे आकाशातून दिसणारे विहंगमय दृश्य सर्वप्रथम ईटीव्ही भारतवर - Kalamba Lake
सहा ते सात दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील कळंबा तलाव भरला आहे. या तलावाचे आकाशातून केलेले चित्रीकरण ई टीव्ही भारत च्या दर्शकांसाठी आणले आहे.