ETV Bharat / city

Panchganga river in Kolhapur : पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन - राधानगरी पाणलोट क्षेत्र मोठ्या प्रमाणात पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Panchganga river in kolhapur crossed alert level ) सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट ( Panchganga river in kolhapur ) क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने ( kolhapur heavy rain ) वाढ होऊ लागली आहे.

Panchganga river in kolhapur crossed alert level
पंचगंगा नदी इशारा पातळी कोल्हापूर
author img

By

Published : Aug 10, 2022, 6:38 AM IST

मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Panchganga river in kolhapur crossed alert level ) सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट ( Panchganga river in kolhapur ) क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने ( kolhapur heavy rain ) वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या 98 टक्के भरले असून धरणातून 1 हजार 600 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

पाण्याने काठोकाठ भरलेला बंधारा

हेही वाचा - Indian Independence Day: चळवळींना वरदहस्त देणारे राजर्षी शाहू महाराज; वाचा सविस्तर...

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आजही जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राधानगरी धरणात मोठ्या प्रमाणत पाण्याची आवक सुरू असल्याने धरण 100 टक्के भरल्यास राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे.

पंचगंगा नदी इशारा पातळीवर - कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. काल रात्री 10 च्या सुमारास नदीने इशारा पातळी गाठली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 39 फुटावर गेली असून, पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 71 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी गाठल्याने यंत्रणाही सतर्क झाल्या असून प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर, दरवर्षी महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावांतील गावकऱ्यांना त्वरित सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - EXCLUSIVE : मुसळधार पावसाने पन्हाळा गड पुन्हा ढासळू लागला; पायथ्याला राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.