कोल्हापूर-- कोल्हापूरच्या अनुराधा भोसले हे नाव आता महाराष्ट्राबरोबरच जगाच्या पाठीवर अभिमानानं घेतल जातंय. याच कारणही विशेष आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील अवनी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बालकामगार , वीट भट्टी कामगारांची मुलं , कचरावेचक महिलांची मुलं अशा वंचित घटकांसाठी मोठे काम केले आहे. खुद्द महानायक अभिताभ बच्चन अनुराधा भोसले यांच्या कामाने प्रेरित झाले आहेत. पाहुयात अनुराधा भोसले यांच्या कार्याची ही संघर्षगाथा..
कोल्हापूरच्या सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या अनुराधा भोसले
गेल्या २७ वर्षापासून अनुराधा भोसले या बालकामगार , वीट भट्टी कामगारांची मुलं , कचरावेचक महिलांची मुलं अशा वंचित घटकांना बालकल्याण अंतर्गत संगोपन करून त्यांना स्वावलंबी करण्याचा पुढाकार त्यांनी घेतला आहे. मुळच्या अहमदनगरच्या असणाऱ्या अनुराधा भोसले या तीस वर्षांपूर्वी कोल्हापुरात आल्या. सामाजिक कामाला वाहून घेत त्यांनी इतरांसाठी समाजकार्याच्या त्या प्रेरणा स्रोत ठरल्या... हे काम दिवस रात्र अखंडितपणे सुरू ठेवलं. त्यासाठी कोल्हापूरकरांची मदत देखील त्यांना मोठी झाली आहे. अनुराधा भोसले एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी कोल्हापूर बरोबरच सातारा आणि सांगली येथेदेखील सामाजिक काम सुरू ठेवलं. कोल्हापूर जिल्ह्यातील अवनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करताना अवनी बरोबरच एकटी संस्थेच्या माध्यमातून वंचित समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आतापर्यंत अवनी संस्थेच्या माध्यमातून 75 हजार मुलांना बाल हक्क मिळवून दिलेत. गेली सत्तावीस वर्ष भोसले या बालकामगारांची सुटका करून त्यांना शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी उचलत आहेत. सरकारबरोबरच समन्वय साधून मुलांना शिक्षण देण्यापासून ते स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. या अंतर्गत त्या बालगृह चालवतात.
हेही वाचा -राज्यातील चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणार अतिविशेषोपचार रुग्णालय
सामाजिक कार्य करत असताना कोल्हापूरकरांनी देखील त्यांना भरभरून मदत केली. आज शेकडो मुलांच्या त्या माता आहेत. अनेकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे आणि याच अनुराधा भोसले यांच्या कार्याला प्रेरित होऊन महानायक अभिताभ बच्चन यांनी सोनी वाहिनीवरील कोण बनेगा करोडपती या मालिकेत त्यांना निमंत्रित केलं होतं. अवनी संस्थेचे आणि अनुराधा भोसले यांचे काम पाहून महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील या संस्थेला अकरा लाखांची मदत केली आहे. तर त्यांच्या या सामाजिक कार्यात कार्याला मदत करण्याचं आव्हान देखील बच्चन यांनी केले आहे. अवनीच्या माध्यमातून त्यांनी उभं केलेल्या सामाजिक कामाची प्रेरणा इतरांनी तर घ्यावीच म्हणूनच सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा भोसले यांच्या कार्याला सलाम....
हेही वाचा -मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञासिंहसह सर्व आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश