ETV Bharat / city

Mango Festival Kolhapur : नागरिकांनी घेतला पहिल्यांदाच तब्बल १९ जातींच्या आंब्यांचा आस्वाद

कोल्हापुरातील शाहू मिल ( Shahu Mill ) येथे दिनांक 19 ते 22 मे दरम्यान आंबा महोत्सवाचे ( Mango Festival in Kolhapur ) आयोजन करण्यात आले आहे. बाजारात साधारण रत्नागिरी, देवगड, पायरी, अशा विविध प्रकारचे आंबे लोकांना माहीत आहेत. मात्र आणखी अनेक जातींचे आंबे ( many varieties Mangoes ) आहेत, की जी लोकांना माहीत नाही. अशा तब्बल 20 ते 22 प्रकारच्या प्रजातींचे आंबे या महोत्सवात पाहायला मिळत आहे.

Mango Festival Kolhapur
Mango Festival Kolhapur
author img

By

Published : May 20, 2022, 4:45 PM IST

Updated : May 20, 2022, 5:10 PM IST

कोल्हापूर - लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत कोल्हापुरातील शाहू मिल ( Shahu Mill ) येथे दिनांक 19 ते 22 मे दरम्यान आंबा महोत्सवाचे ( Mango Festival in Kolhapur ) आयोजन करण्यात आले आहे. बाजारात साधारण रत्नागिरी, देवगड, पायरी, अशा विविध प्रकारचे आंबे लोकांना माहीत आहेत. मात्र आणखी अनेक जातींचे आंबे ( many varieties Mangoes ) आहेत, की जी लोकांना माहीत नाही. अशा तब्बल 20 ते 22 प्रकारच्या प्रजातींचे आंबे या महोत्सवात पाहायला मिळत आहे. कोल्हापूरकर सुद्धा या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. थेट उत्पादकापासून ग्राहक आंबा खरेदी करत असल्याने उत्पादकालाही फायदा मिळत असून ग्राहक उच्च दर्जाचे व नैसर्गिकरीत्या पिकवलेली आंबे चाखत आहेत.

आंबा महोत्सवाचा घेतलेला आढावा

19 ते 22 मे दरम्यान असणार महोत्सव : कोल्हापुरातील शाहू मिल येथे गेल्या महिनाभरापासून विविध भागातून तसेच विविध माध्यमातून लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना मानवंदना दिली जात आहे.मात्र आता चक्क फळांचा राजा आंबा ही शाहू मिल येथे दाखल झाला आहे. कृतज्ञता पर्वा निमित्त महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कोल्हापूर बाजार समिती यांच्यातर्फे शाहू मिल येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 19 मे ते 22 मे दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात रत्नागिरी,सिंधुदुर्ग या कोकण भागातून तब्बल 18 ते 20 आंबा उत्पादक या महोत्सवात आपले आंबे विक्रीसाठी आणले आहेत.थेट उत्पादक ते ग्राहक आंबे विक्री होत असल्याने पहिल्याच दिवशी हजारो ग्राहकांनी येथे भेट देऊन नैसर्गिक रित्या पिकवलेला आंबा खरेदी केला आहे. यामुळे पुढील चार दिवस कोल्हापूरकरांना आंबा महोत्सवातून अगदी माफक दरात आंबे घेण्याची सोय प्रशासनातर्फे करून देण्यात आली आहे.

'या' जातींचे आंबे कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध : आंबा महोत्सवात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागातील एकूण 20 शेतकरी सहभागी झाले असून तब्बल 19 टन आंबा शाहू मिल येथे दाखल झाला आहे. यामध्ये वनराज, केन्ट, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, फरणांडीन, दुधपेढा, गोवा मानखुर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली, नीलम, देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, केशर व किट या आंब्यांच्या प्रजातींचा समावेश असून खास शुगर फ्री वनराज आंबा व किट आंबा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे आंबे बाहेरील बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध असून 200 रुपये पासून ते 600 रुपयेपर्यंत ग्राहकांना मिळत आहे. अंदाजे सव्वा सहा लाखाहून अधिक रकमेची उलाढाल पहिल्याच दिवशी झाल्याचे पणन मंडळाचे उपव्यवस्थापक सुभाष घुले यांनी सांगितले आहे.

खरेदीसाठी कोल्हापूरकरांची शाहू मिलकडे वाट : आंबा खरेदीसाठी कोल्हापूरकर शाहू मिलकडे येत असून फक्त शहरातीलच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिक ही येथे येत आहेत. येथे ग्राहक प्रवेश करताच आंब्यांच्या सुगंधाने ग्राहक हरवून जात आहे. शेतकऱ्यांकडून विविध प्रजातीच्या आंब्यांची माहिती घेत आहेत. तसेच गोड व रसाळ आंबे मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने आंबा उत्पादकही भारावून गेला आहे. तर अशा प्रकारचा आंबा महोत्सव प्रशासनाने दरवर्षी करावा, असे ग्राहकांनी म्हटले आहे. उत्पादक ते ग्राहक विक्री होत असल्याने आंबा उत्पादकांनी ही शासनाचे आभार मानले आहे. आंबा सोबतच उत्पादकांनी ग्राहकास उच्च दर्जाचे काजूही येथे उपलब्ध करून दिले आहेत. तर कच्चामालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे जाम, इसेन्स, रानमेवा ही कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध झाले आहे.

हेही वाचा - Nashik Grape Farm Hotel : द्राक्ष बागेत थाटले हॉटेल; खवय्ये घेतायेत झणझणीत मिसळ पाव खाण्याचा आनंद

Last Updated : May 20, 2022, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.