कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भरत संभाजी वाणी (वय 44, रा. मंडलिक वसाहत, कासारवाडी, ता. हातकलंगले) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात ऊसाला पाणी देत असताना पाऊस आल्याने शेजारील एका झाडाखाली आसरा घेण्यासाठी गेले असता झाडावर वीज कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेमध्ये त्यांची दोन मुले किरकोळ जखमी झाली आहेत.
पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आसरा घेतला अन्
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाचच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात ढगाळ तयार झाले होते. अचानकच वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली झाला. आपल्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेलेले भरत वाणी दोन मुले करण आणि अर्जुन सोबत तिथेच अडकले. पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी शेतातच एका झाडाखाली जाऊन आसरा घेतला. यावेळी वीज पडून भरत वाणी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुलं मात्र या घटनेमध्ये किरकोळ जखमी झाली आहेत. या घटनेचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी धाव घेतली. भरत वाणी हे मूळचे बीडचे. रोजगारासाठी ते काही वर्षापूर्वी कासारवाडी येथील शरद मंडलिक यांच्या शेतात घरगडी म्हणून कामाला होते. ते कुटुंबासह तिथेच राहत होते. पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी बीडहून आलेल्या भरत वाणी यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कासारवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापुरात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू - कोल्हापूर अवकाळी
पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी बीडहून आलेल्या भरत वाणी यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कासारवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.