कोल्हापूर - ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण ( OBC Reservation ) मिळाल्यानंतर आता भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेयवाद सुरू झाला आहे. आज ( 21 जुलै ) कोल्हापुरात दसरा चौकात शिवसेनेने तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या वतीने विजय जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षाकडून आरक्षण हे आमच्या मुळेच मिळाला म्हणत एकमेकांवर टीका करण्यात ( Shivsena And Bjp Celebration In Kolhapur )आली.
दसरा चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिकांनी एकमेकांना साखर पेढे भरवत जल्लोष साजरी केला. तर, दुसऱ्या बाजूला भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरी केला यावेळी दोघांनी आरक्षण हे आमच्यामुळेच मिळाला असा दावा ही करण्यात आला.
आरक्षणाचं सगळे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांनाच - महाविकास आघाडीने अडीच वर्ष ओबीसी समाजाला फसवलं होते. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि तातडीने ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका करण्यात आली. आरक्षणाचं सगळे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना जातं, असं देखील भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी ठणकावून सांगितल आहे.
आरक्षण मिळवण्यात महाविकास आघाडीचा 99 टक्के वाटा - काही ही झालं तरी भाजपमुळेच झालं हे म्हणण्याची सवय ही आता सर्वांना माहिती झाली आहे. हे जास्त काळ टिकणार नाही. ठाकरे सरकारने बार्टी आयोग स्थापन केला होता. आम्ही करून दाखवणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानुसार सर्वोच्च न्यायलायात जे मांडलं ते सत्यच होते. यामुळेच हे आरक्षण मिळवण्यात महविकास आघाडीचा 99 टक्के वाटा होता, असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले.
हेही वाचा - BJP MLA Fraud : 'बंटी बबली'ने केली भाजपच्या 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक; दोघांना अटक