कोल्हापूर- राज्यात आजपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र कोल्हापूर जिल्हा प्रशासना नियमांची अंमलबजावणी करताना उदासीन दिसत आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर अद्याप कोणतीच नियंत्रण यंत्रणा सुरू केली नसल्याने मुंबई, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. त्यामुळे यांचा शोध घेणे प्रशासनाला मोठे आव्हान ठरणार आहे.
राज्यात वाढत्या कोरोना बधितांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने २ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याच्या नव्या नियमानुसार जिल्हा अंतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करण्यास मुभा असणार आहे. किराणा दुकाने, भाजीपाला, फळे यांची दुकाने सुरू ठेवण्यास सकाळी ७ ते ११ परवानगी आहे. मात्र, जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यास बंदी असणार आहे. जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना होम कोरोटाईन करण्यात येणार आहे. मात्र, यासाठीची नियंत्रण यंत्रणा जिल्हयाच्या कोणत्याच सीमेवर तैनात करण्यात आली नाही. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरून पुणे बेंगलोर महामार्गावरील किणी टोल नाका येथून ईटीव्ही भारतने रियालिटी चेक केली. त्यावेळी जिल्ह्याच्या सीमेवर कोणतीच नियंत्रण यंत्रणा तैनात करण्यात आलेली नासल्याचे आढळले. त्यामुळे मुंबई, पुणे, सातारा, सांगली यासह इतर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोणतीच यंत्रणा उभी केली नसल्याने येणाऱ्या काळात कोल्हापूरात या प्रवाशांमुळे कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनाची नोंद होत नसल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात अडचण येणार आहे. गेल्या चोवीस तासात ८२१ नवीन रुग्ण सापडले असून आज दिवसभरात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या सहा हजारांवर गेली आहे. कोल्हापूरात परजिल्ह्यातून नागरिकांची संख्या वाढल्याने येणाऱ्या काळात बधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरच्या सीमांवर 'नो' यंत्रणा, आवो-जावो घर तुम्हारा स्थिती
राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी ब्रेक द चेन अतर्गंत लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या सीमेवर कोणत्याही प्रकारची यंत्रणा उभारण्यात आलेली नाही.