ETV Bharat / city

धोका वाढतोय... कोल्हापुरात आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णांची संख्या 36 वर

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 36 वर पोहोचली आहे.

kolhapur corona
kolhapur corona
author img

By

Published : May 16, 2020, 3:06 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात आज आणखीन 6 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, गेल्या 24 तासात एकूण 8 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. आजच्या 6 रुग्णांना पकडून जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 36 वर गेली आहे. आज सकाळी आणखीन 6 रुग्ण वाढल्याची माहिती मिळताच संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापुरात आज नवीन रुग्णांची नोंद झाली. याबाबत माहिती अशी :

जयसिंगपूर येथील 18 आणि 20 वर्षांचे 2 तरुण, राधानगरी (खिंडी व्हारवडे) येथील 23 वर्षांचा 1 तरुण आणि कागल तालुक्यातील 45 वर्षांची 1 महिला नातेवाईक असे एकूण 2, गडहिंग्लजमधील कवळीकट्टीतला 35 वर्षांचा 1 व्यक्ती, भुदरगडमधील 1 रुग्ण, हा रुग्ण मुंबईवरून कोल्हापुरात चालत आल्याची माहिती, राधानगरीतील 2 रुग्ण हे आधीच सीपीआर रुग्णालयात दाखल असलेल्या खिंडी व्हारवडे येथील 2 रुग्णांचे जवळचे नातेवाईक आहेत. एक त्या कॅन्सरग्रस्त मुलीची आत्या आणि एक चुलत भाऊ, जयसिंगपूर येथील नवीन दोन्ही रुग्णांनी आधी सापडलेल्या दोन रुग्णांसोबत सोलापूर ते कोल्हापूर असा केला होता प्रवास, नवीन रुग्णांनी मुंबई ते कोल्हापूर आणि सोलापूर ते कोल्हापूर प्रवास केल्याची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.